जाहिरात

IPL 2025 GT Vs PBKS: श्रेयसच्या पंजाब किंग्सची 'बल्ले बल्ले'... गुजरातचा होमग्राऊंडवर उडवला धुव्वा!

IPL 2025 GT Vs PBKS: श्रेयसच्या पंजाब किंग्सची 'बल्ले बल्ले'... गुजरातचा होमग्राऊंडवर उडवला धुव्वा!

IPL 2025 GT vs PBKS: आयपीएलमधील पाचवा सामना आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यामध्ये खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने गुजरात टायन्सवर मात केली. पंजाब किंग्सने दिलेले 244 धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव 231  धावांवर आटोपला. गुजरातकडून साई सुदर्शन, जॉस बटलरने वादळी खेळी केली मात्र ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. 

('NDTV मराठी' चं अधिकृात व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंजाब किंग्सने दिलेल्या 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातला ग्लेन मॅक्सवेलने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार शुभमन गिलला आऊट केले. गिलने 14 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या. त्यानंतर साई सुदर्शनने वादळी खेळी करत गुजरातचा डाव सावरला. साई सुदर्शन 41 चेंडूत 74 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 6 षटकार लगावले. त्यानंतर जॉस बटलर आणि शरफेन रदरफोर्डने डाव सांभाळला. मात्र ते संघाला विजयी करु शकले नाहीत. जॉस बटलरने 33 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या. 

या सामन्यात पंजाबने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. पंजाबच्या प्रियांश आर्यने पदार्पणाच्या सामन्यात 47 धावांची शानदार खेळी करत पंजाब किंग्जला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रेयस अय्यरने 97 धावांची शानदार खेळी केली, त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले.  पंजाब किंग्जला 243 धावांपर्यंत पोहोचवण्यात शशांक सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने श्रेयस अय्यरसोबत 81 धावांची भागीदारी केली. मोहम्मद सिराजने टाकलेल्या शेवटच्या षटकात शशांकने 5 चौकार मारले. या षटकात एकूण 23 धावा झाल्या.

कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या स्फोटक खेळीमध्ये 42 चेंडूत 9 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 97 धावा केल्या. पंजाब किंग्जच्या डावात एकूण 16 षटकार मारण्यात आले. अय्यरच्या 9 षटकारांव्यतिरिक्त, प्रियांश आर्य, मार्कस स्टोइनिस आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी 2 षटकार मारले. अजमतुल्लाहनेही एक षटकार मारला.

ट्रेंडिंग बातमी - DC Vs LSG: दिल्लीच्या आशुतोषची कमाल खेळी! हरलेला सामना फिरवला, लखनौचा पराभव

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन) : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, ग्लेन मॅक्सवेल, सूर्यांश शेडगे, अजमतुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रविश्रीनिवासन साई किशोर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा