
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी 31 ऑक्टोबरला सर्व फ्रेंचाइजनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. डिफेंडिंग चॅम्पियन केकेआरने सहा खेळाडूंना रिटेन केलं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे कॅप्टन श्रेयस अय्यरला कोलकाताने रिटेन केलं नाही. केकेआरने सुनील नारायण, आंद्रे रसेल, रिंकु सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रमनदीप सिंहला रिटेन केलं आहे. आयपीएल 2023 मध्ये पाच बॉलमध्ये पाच सिक्सर लगावून केकेआरला सामना जिंकवून देणारे रिंकु सिंह फ्रेंचायजीचे सर्वात मोठे रिटेंशन ठरले आहे. कोलकाता नाइटरायडर्सने त्याला 13 कोटी देऊन रिटेन केलं आहे.
रिंकू सिंहची बंपर कमाई
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी IPL 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी तीन वेळा आयपीएल चॅम्पियन केकेआरने रिंकू सिंहला 55 लाखात रिटेन केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत रिंकू या सॅलरीवर टीमसाठी खेळत होते. मात्र आता आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी रिंकू सिंहची दिवाळीच्या निमित्ताने बंपर कमाई झाली आहे. 31 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात होता. त्यावेळी रिंकू सिंह मालामाल झाला. त्याला कोलकाताने रिटेन करताना उर्वरित पाच खेळाडूंच्या तुलनेत सर्वाधिक पैसे दिले. रिंकूला 13 कोटी देण्यात आले.
नक्की वाचा - IPL 2025 BIG Retention: आयपीएल रिटेन्शनमधील सर्वात महागडे खेळाडू; वाचा यादी
रिंकू सिंहचं आयपीएल करिअर...
27 वर्षीय रिंकू सिंहने 2018 मध्ये आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. तो पहिल्या सीजनपासून कोलकाता नाइटरायडर्ससाठी खेळत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या 46 सामान्यात 143 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करीत 893 धावा काढल्या. त्याने आयपीएलमध्ये 67 चौकार आणि 46 षटकार लगावले. याशिवाय रिंकू भारतासाठी 26 टी20 आणि 2 वनडे सामने खेळला आहे. टी20 मध्ये त्याने 175 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करीत 479 धावा काढल्या आणि तीन वेळा हाफ सेंच्युरी केली. तर वनडेला त्याच्या नावे 55 धावा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world