जाहिरात

IPL 2025 BIG Retention: आयपीएल रिटेन्शनमधील सर्वात महागडे खेळाडू; वाचा यादी

IPL auction news : आयपीएल रिटेनशनमध्ये सीएसकेने आपला सर्वात मोठा खेळाडू धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून आपल्या संघासोबत ठेवले आहे.

IPL 2025 BIG Retention: आयपीएल रिटेन्शनमधील सर्वात महागडे खेळाडू; वाचा यादी

IPL 2025 top 5 big Retention Players List: आयपीएलच्या आगामी सीझनपूर्वी सर्व टीमनी आपल्या काही खेळाडूंना रिटेन केले आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी खेळाडूंना रिटेन करण्याची मुदत आता संपली आहे. त्याआधी फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन आयपीएलमधील सर्वात महागडा रिटेन खेळाडू ठरला आहे. 

हैदराबाद संघाने क्लासेनला 23 कोटी रुपये देऊन रिटेन केले आहे. आरसीबीने कोहलीला 21 कोटी रुपये दिले आहेत. जसप्रीत बुमराहला मुंबईने 18 कोटींमध्ये कायम ठेवले आहे. हार्दिक पांड्याला देखील मुंबईने 16.35 कोटींमध्ये रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे.

यशस्वी जैयस्वाल राजस्थान रॉयल्सने 18 कोटींमध्ये रिटेन केले आहे. तर कर्णधार संजू सॅमसनलाही राजस्थानने 18 कोटींमध्ये रिटेन केले आहे. चेन्नई सुपरकिंग्सने रविंद्र जडेजाला 18 कोटींमध्ये रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रिटेन केलेला सर्वात महागडे खेळाडू 

  • हेन्रिक क्लासेन (23 कोटी), सनरायझर्स हैदराबाद
  • विराट कोहली (21 कोटी), आरसीबी
  • निकोलस पूरन (21 कोटी), लखनऊ सुपरजायंट्स
  • जसप्रीत बुमराह (18 कोटी), मुंबई इंडियन्स
  • पॅट कमिन्स (18 कोटी), सनरायझर्स हैदराबाद
  • यशस्वी जैस्वाल (18 कोटी), राजस्थान रॉयल्स
  • संजू सॅमसन (18 कोटी), राजस्थान रॉयल्स
  • रवींद्र जडेजा (18 कोटी), सीएसके
  • रुतुराज गायकवाड (18 कोटी), चेन्नई सुपर किंग्ज
  • रशीद खान (18 कोटी) गुजरात टायटन्स
  • शुभमन गिल (16.5 कोटी), गुजरात टायटन्स
  • हार्दिक पांड्या (16.35 कोटी), मुंबई इंडियन्स
  • रोहित शर्मा (16.3 कोटी), मुंबई इंडियन्स

चेन्नईने धोनीला 4 कोटींमध्ये रिटेन केले

आयपीएल रिटेनशनमध्ये सीएसकेने आपला सर्वात मोठा खेळाडू धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून आपल्या संघासोबत ठेवले आहे. म्हणजेच सीएसकेने केवळ 4 कोटी रुपयांमध्ये धोनीला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com