
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) झालेल्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचे (Lucknow Super Giants) आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. लखनौनं या सिझनमध्ये सुरुवात चांगली केली होती. पण, नंतर त्यांना सातत्य राखता आलं नाही. सोमवारी झालेल्या 'करो वा मरो' च्या मॅचमध्ये हैदराबादने लखनौचा 6 विकेट्सनं पराभव केला. त्यानंतर लखनौचे प्ले ऑफमध्ये (IPL 2025 Playoff) प्रवेश जाण्याचे स्वप्न भंगले. या पराभवानंतर लखनौचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला पंत?
हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना पंत म्हणाला की, '"निश्चितपणे हा आमचा सर्वोत्तम सिझनपैकी एक असू शकला असता, परंतु दुखापतग्रस्त खेळाडूंची कमतरता भरून काढणे कठीण झाले. ही स्पर्धा सुरु होत असताना अनेक कमतरता, दुखापतींचा सामना करावा लागला आणि एक टीम म्हणून आम्ही याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला, परंतु आमच्यासाठी त्या कमतरता भरून काढणे कठीण झाले.
आम्ही लिलावाची (Auction) ज्या पद्धतीने योजना आखली होती, बॉलिंगही तशीच असती तर.. पण हे क्रिकेट आहे, कधीकधी गोष्टी तुमच्या अनुकूल असतात आणि कधीकधी नाही, आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. आही या सिझनच्या नकारात्मक गोष्टींपेक्षा जास्त भर हा सकारात्मक गोष्टींवर देऊ. '
( नक्की वाचा : LSG vs SRH : मलिंगाची सुपरमॅन कमाल, ऋषभ पंत पुन्हा स्वस्तात आऊट, संजीव गोयंकांची प्रतिक्रिया Viral )
बॅटर्सचे कौतुक, बॉलिंगमध्ये त्रुटी
ऋषभ पंतने फलंदाजांचे कौतुक करत सांगितले की, 'आमच्याकडे मजबूत बॅटिंग ऑर्डर आहे. ही या सिझनमधील सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे.आमच्या बॉलर्सनीही अनेकदा चांगली बॉलिंग केली. पण ते कमकुवत होते. आम्हाला 10 रन्स कमी पडले हे माहिती होतं. कारण, विकेट्स चांगली होती. आम्ही काही टप्प्यात चांगले खेळलो. पण, आम्हाला अनुकूल परिस्थितीचा फायदा घेता आला नाही. '
या संपूर्ण सिझनमधील टीमच्या कामगिरीवर पंत म्हणाला की, 'आम्ही या सिझनच्या पहिल्या टप्प्यात खरोखरच चांगले खेळलो. पण, दुसऱ्या टप्प्यात चांगल्या टीमशी स्पर्धा करणे कठीण होत गेले. राठीनं आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच सिझनमध्ये ज्या पद्धतीनं बॉलिंग केली ती सकारात्मक गोष्टींपैकी एक आहे.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world