
IPL 2025: आयपीएलच्या मैदानात आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार असून त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच पुन्हा एकदा कॅप्टन कूल या आयपीएलनंतर निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता धोनीने त्याच्याच स्टाईलमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. धोनी आता ४३ वर्षांचा आहे आणि प्रत्येक हंगामाच्या शेवटी त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर धरत असतात. यावर आता स्वतः धोनीनेच महत्त्वाचा खुलासा केला आहे. "मी जोपर्यंत इच्छितो तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळू शकतो. ही माझी फ्रँचायझी आहे. जरी मी व्हीलचेअरवर असलो तरी ते मला ओढून खेळायला आणतील.. अशी प्रतिक्रिया महेंद्रसिंग धोनीने दिली आहे.
दुसरीकडे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. यावेळीही धोनी संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी खेळेल अशी आशा सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने व्यक्त केली आहे. यावेळी संघात अनेक नवीन खेळाडू सामील झाले आहेत आणि कधीकधी धोनीसारखे चेंडू मारणे कठीण असते. म्हणूनच धोनीची संघात उपस्थिती मला आणि इतर खेळाडूंनाही प्रेरणा देते, असं त्याने म्हटले आहे.
नक्की वाचा - European T20 Premier League: अभिषेक बच्चन युरोपीयन टी-20 लीगसाठी सज्ज; 15 जुलैपासून 6 टीम भिडणार
तसेच धोनी कधीही फॉर्ममध्ये नाही किंवा त्याची तंदुरुस्ती बिघडत आहे असे मला कधीच वाटले नाही. जर तुम्ही सचिन तेंडुलकरकडे पाहिले तर तो 50 व्या वर्षीही खूप चांगली फलंदाजी करत आहे. म्हणूनच मला वाटते की धोनी बराच काळ खेळणार आहे,असंही तो म्हणाला.
आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे संघ चेपॉकमध्ये एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानले जातात. दोन्ही संघांनी विक्रमी ५-५ वेळा विजेतेपद जिंकले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world