
IPL 2025 Playoffs Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा लीग सामन्यांचा टप्पा संपला असून आता क्रिकेटप्रेमींना प्लेऑफच्या रोमांचक सामन्यांची उत्सुकता लागली आहे. या हंगामात उत्तम कामगिरी केल्यानंतर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी टॉप-२ मध्ये स्थान मिळवले आहे, तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. आता जेतेपदाच्या शर्यतीत चार संघ शिल्लक आहेत आणि येत्या काळात होणारे सामने खूप रोमांचक होणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लीग टप्प्यानंतर पंजाब किंग्जने 19 गुण आणि 0.372 च्या नेट रन रेटसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही 19 गुण मिळवले, परंतु 0.301च्या नेट रन रेटसह ते दुसऱ्या स्थानावर राहिले. दोन्ही संघांनी 14 पैकी 9 सामने जिंकले तर 4 गमावले आणि 1 सामना अनिर्णीत राहिला. गुजरात टायटन्स 18 गुणांसह, 0.254 च्या नेट रन रेटसह तिसऱ्या स्थानावर राहिला, तर मुंबई इंडियन्स 16 गुणांसह आणि 1.142 च्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर राहिला.
प्लेऑफ वेळापत्रक
क्वालिफायर 1 (29 मे, मुल्लानपूर): पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला क्वालिफायर 2 मध्ये आणखी एक संधी मिळेल
एलिमिनेटर 2 (३० मे, मुल्लानपूर): मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स
या करो या मरोच्या सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ एकमेकांशी भिडतील. पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये जाईल.
क्वालिफायर-2 ( 1जून, अहमदाबाद): क्वालिफायर-1 मध्ये पराभूत विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता
या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत पोहोचेल.
अंतिम सामना (3 जून, अहमदाबाद): क्वालिफायर-1 मध्ये विजेता विरुद्ध क्वालिफायर-2 मध्ये विजेता
या सामन्यात आयपीएल 2025 ट्रॉफी कोणता संघ जिंकेल हे ठरवले जाईल.
( नक्की वाचा : IND vs ENG : 10 किलो वजन कमी केलं पण तरीही सरफराजचं काय चुकलं? 3 कारणांमुळे झाली नाही निवड )
दरम्यान, मुल्लानपूर येथे 30 मे रोजी होणाऱ्या एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट 1.142 होता, जो त्यांच्या आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजीच्या ताकदीचे प्रतिबिंब आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सने संपूर्ण हंगामात सातत्य दाखवले आणि a सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. हा सामना करो या मरो असा असेल आणि दोन्ही संघ फायनलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतील. या सामन्यातील पराभूत संघ थेट स्पर्धेच्या बाहेर जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world