जाहिरात

SRH vs LSG: शार्दुल ठाकूरची कमाल, SRH चे धुरंधर फेल.. विजयासाठी 'इतक्या' धावांचे टार्गेट!

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि यांनी सर्वाधिक धावा केल्या. 

SRH vs LSG: शार्दुल ठाकूरची कमाल, SRH चे धुरंधर फेल.. विजयासाठी 'इतक्या' धावांचे टार्गेट!

IPL 2025 SRH Vs LSG: आयपीएल 2025 चा 7 वा सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या संघाने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि यांनी सर्वाधिक धावा केल्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर लखनौच्या संघासमोर हैदराबादची धडाकेबाज फलंदाजी भेदण्याचे आव्हान होते. मात्र शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादवने भेदक मारा करत हैदराबादच्या दिग्गजांना स्वस्तात तंबुत पाठवले. शार्दुल ठाकूरने सामन्याच्या तिसऱ्याच षटकामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दोन स्फोटक फलंदाजांना सलग दोन चेंडूंवर बाद करून आपल्या संघाला मोठा दिलासा दिला.

अभिषेक शर्मा अवघ्या सहा धावांवर बाद झाल्यानंतर ईशान किशानही शून्यावर तंबुत परतला. त्यानंतर ड्रॅव्हिस हेडने फलंदाजीची बाजू सांभाळली.  हेड अर्धशतकाच्या जवळ असतानाच नवख्या प्रिन्स यादवने तिसरा धक्का दिला. 28 चेंडूत 47 धावा करून ट्रॅव्हिस हेड बाद झाला. त्याने 5 चौकार आणि  3 षटकार मारले.

हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडसह अनिकेत वर्माने 13 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने 5 षटकार मारले. नितीश रेड्डीने 32 धावांचे योगदान दिले. तर अभिषेक शर्मा 6 धावा करून बाद झाला. क्लासेन 26 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सने 4 चेंडूत 18 धावा केल्या. अशाप्रकारे संघाने 20 षटकांत 190 धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सकडून शार्दुल ठाकूरने चांगली गोलंदाजी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. शार्दुलने 4 षटकांत 34 धावा दिल्या. दिग्वेश राठी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी  1विकेट घेतली. प्रिन्सने 4 षटकांत 29 धावा दिल्या. तर बिश्नोईने  4षटकांत 42  धावा दिल्या.

 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: