
IPL 2025 SRH Vs RR: सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये दुसरा सामना होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या या सामन्यात ईशान किशनने वादळी फलंदाजी करत यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले आहे. ईशान किशनने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत चौकार- षटकारांचा पाऊस पाडला. त्याने 45 चेंडूत 100 धावा केल्या. यासोबतच हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमावत 286 धावा केल्या असून राजस्थान रॉयल्समोर 287 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्सने घेतला. त्यानंतर जबरदस्त फलंदाजांची फौज असलेल्या हैदराबादच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. सलामवीर अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशनने सामन्याची सूत्रे हाती घेतली. ईशान किशनने फक्त 45 धावात 100 धावा कुटल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि सहा षटकार ठोकले.
𝐓𝐡𝐞 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐓𝐎𝐍 𝐨𝐟 #TATAIPL 𝟐𝟎𝟐𝟓 𝐛𝐞𝐥𝐨𝐧𝐠𝐬 𝐭𝐨 𝐈𝐬𝐡𝐚𝐧 𝐊𝐢𝐬𝐡𝐚𝐧! 💯
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
What a way to set the tone for the season 🔥
Updates ▶ https://t.co/ltVZAvInEG#SRHvRR | @SunRisers | @ishankishan51 pic.twitter.com/pWFWKeEiox
सामन्याच्या सुरुवातीला ट्रॅव्हिस हेडने चौकार षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या 21 चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली. ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. हेड तुफान फटकेबाजी करत असतानाच तुषार देशपांडेने त्याचा काटा काढला. तो 31 धावात 67 धावा करुन आऊट झाला. दुसरीकडे ईशान किशनने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली होती.
ईशान किशनने स्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 200 च्या स्ट्राईक रेटने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने शतकाकडे वाटचाल केली. नितीश रेड्डी बाद झाल्यानंतर त्याला हेनरिक क्लासेनने साथ दिली. क्लासेनने 14 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने चार चौकार आणि 1 षटकार लगावला. हैद्राबादसाठी अभिषेक वर्माने 25 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 67 तर नितीश कुमार रेड्डी 15 चेंडूत 30 धावा करू बाद झाला.
दरम्यान, हैदराबादच्या संघाने 286 धावांचा उभारलेला डोंगर हा आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर आहे. हैदराबादच्या सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळी करत चौकार षटकार ठोकले. या सामन्यात तब्बल 12 षटकार आणि 34 चौकार ठोकले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world