जाहिरात

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंड सोबत झाला स्पॉट? हातात हात घातलेला Video झाला Viral, सत्य काय?

'फॅक्ट चेक'मध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंड सोबत झाला स्पॉट? हातात हात घातलेला Video झाला Viral, सत्य काय?
  • वैभव सूर्यवंशीचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे
  • या व्हिडीओचे तांत्रिक तपासणीनंतर तो डीपफेक असल्याचे आणि एडिट केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे
  • व्हिडीओमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा गैरवापर करून वैभवचा चेहरा मूळ व्हिडीओवर मॉर्फ केला गेला आहे

Vaibhav Sooryavanshi Girlfriend: वैभव सूर्यवंशी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आयपीएलमध्ये त्याने केलेली कामगिरी असो की श्रीलंका दौऱ्यात केलेला धकामा असो. चर्चा ही वैभवचीच आहे. आता तो इंग्लंड दौऱ्याऱ्यासाठी रवाना झाला आहे. त्याच वेळी वैभवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये वैभव सूर्यवंशी आपल्या गर्लफ्रेंडसोबत स्पॉट झाल्याचं दिसत आहे. पण हा व्हिडीओ खरा आहे की खोटा याबाबत ही चर्चा सुरू झाली आहे.   

खेळा मुळे नाही तर या वेगळ्या कारणामुळे  वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. अवघ्या 16 वर्षांच्या या युवा खेळाडूचा एक व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे क्रीडा जगतात प्रचंड खळबळ उडाली होती. या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा आणि मुलगी एका लक्झरी कारजवळ दिसत आहेत.  तो मुलगा वैभव सूर्यवंशी असल्याचा दावा केला जात होता. व्हिडिओमधील चेहऱ्याचे साधर्म्य पाहून चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा - Vaibhav Sooryavanshi: वैभवला इंग्लंड दौऱ्यात मिळणार वेगळी 'चेंजिंग रुम'; ICC च्या 'या' नियमामुळे निर्णय

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखण्यात आले. त्यानंतर त्याचा तांत्रिक तपासण करण्यात आले. 'फॅक्ट चेक'मध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आहे. शिवाय तो एडिट केलेला आहे. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तो तयार केला गेला आहे. हा एक 'डीपफेक' व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ व्हिडिओमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावर अतिशय हुशारीने वैभव सूर्यवंशीचा चेहरा मॉर्फ करून बसवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नक्की वाचा - Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीसाठी 3 नंबर का निवडला? खास कारण झालं उघड

हा व्हिडिओ वैभवच्या श्रीलंका दौऱ्यानंतरचा असल्याचा खोटा दावा केला जात होता. मात्र, सद्यस्थितीत वैभव सूर्यवंशी हा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. या 16 वर्षीय खेळाडूच्या वाढत्या लोकप्रियतेला आणि प्रतिमेला आंतरराष्ट्रीय दौऱ्यापूर्वी जाणीवपूर्वक धक्का लावण्याचा हा एक सुनियोजित कट होता का अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या क्रिकेट चाहत्यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशा प्रकारे अल्पवयीन खेळाडूचे डीपफेक व्हिडिओ बनवणे हा गंभीर सायबर गुन्हा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com