जाहिरात

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर 'रॉयल्स' विजय, मराठमोळ्या प्रफुल हिंगे समोर राजस्थानची नांगी

राजस्थानने टॉस जिंकला. त्यांनी प्रथन फिल्डींगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर 'रॉयल्स' विजय, मराठमोळ्या प्रफुल हिंगे समोर राजस्थानची नांगी
सौजन्य IPL

IPL 2026: आयपीएलमध्ये आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना राजस्थान समोरल विजयासाठी 210 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. हैदराबादकडून ईशान किशनचे वादळी 91 रन्स केल्या. तर हेनरिक क्लासेनच्या फटकेबाजीमुळे हैदराबादला 20 षटकांत 200 चा टप्पा ओलांडता आला. धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात खराब झाली. फार्मात असलेल्या वैभव सुर्यवंशी खातं ही उघडू शकला नाही. तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याला प्रफुल हिंगे याने आऊट केले. त्यानंतर तर राजस्थानचा डाव प्रफुलच्या गोलंदाजी समोर पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. हिंगेने राजस्थानला लागोपाठ धक्के दिले. त्याने आपल्या दोन ओव्हर्समध्ये सहा धावा देत चार जणांना आऊट केले. त्यात ध्रुव जुलेर 0, लुआन ड्रे 0, आणि कॅप्टन रिआन पराग 4 यांना त्यांनी आऊट केले. त्यानंतर मात्र रविंद्र जडेजा आणि फरेरा यांनी जास्त पडझड होवू दिली नाही. फरेराने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जडेजाची त्याला साथ मिळाली.  फरेरा 69 धावांची खेळी करुन बाद झाला. त्या पाठोपाठ रविंद्र जडेजा ही 45 धावा करून बाद झाला. तिथेच राजस्थानच्या विजयाच्या अपेक्षा मावळल्या.  अखेर राजस्थानचा डाव 159 धावांवर कोसळला. हैदराबादने राजस्थानवर 57 धावांनी विजय मिळवला. 

राजस्थानने टॉस जिंकला. त्यांनी प्रथन फिल्डींगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हैदराबादची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्मा बाद झाला. त्याला सामन्याच्या पहिल्याच चेंडूनवर जोफ्रा आर्चरने आऊट केले.  शर्मा आऊट झाल्यानंतर संघ अडचणीत आला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या ईशान किशनने आक्रमक पवित्रा घेत राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने ट्रेव्हिस हेडसोबत मिळून पॉवरप्लेमध्ये 51 धावा जोडल्या. ट्रेव्हिस हेड 18 धावा करून बाद झाला, पण ईशानने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने एक बाजू लावून धरत हैदराबादचा धावफलक हलता ठेवला होता. 

नक्की वाचा - IPL 2026: खर्च 118 कोटी आणि परफॉर्मन्स 'झिरो'! आयपीएल 2026 मधील महागड्या खेळाडूंचा असा झालाय 'गेम'

ट्रॅव्हिस हेड ही जास्त काळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही. तो 18 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या हेनरिक क्लासेन आणि ईशान किशनची जोडी जमली.  तिसऱ्या विकेटसाठी ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी अवघ्या 39 चेंडूत 88 धावांची तुफानी भागीदारी केली. ईशान किशन आपल्या शतकापासून थोडक्यात मुकला. त्याला शतकाने हुलकावणी दिली. त्याने 44 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 91 धावांची शानदार खेळी केली. हेनरिक क्लासेनने 26 चेंडूत 40 धावा कुटल्या. या दोघांच्या फलंदाजीने राजस्थानच्या गोलंदाजांना घाम फोडला होता.  

नक्की वाचा - KKR vs LSG : Out की Not Out? केकेआरसोबत झाला धोका! बड्या खेळाडूबाबत थर्ड अंपायरच्या निर्णयावर मोठा वाद

नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा यांनी ही छोट्या खेळ्या करत संघाची धावसंख्या वाढवण्यात हातभार लावला.  मधल्या फळीत विकेट्स पडत असताना नितीश कुमार रेड्डी आणि सलिल अरोरा यांनी अखेरच्या टप्प्यात उपयुक्त फटकेबाजी केली. रेड्डीने 13 चेंडूत 28 धावा केल्या, ज्यामुळे हैदराबादला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला. सलिल अरोराने 13 चेंडूत 24 धावा ठोकल्या. त्यामुळे राजस्थानच्या फार्मात असलेल्या फलंदाजी समोर हैदराबाद एक तगडं आव्हान उभं करू शकलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com