Lionel Messi In Mumbai 2025: अर्जेंटिनाचा विश्वविजेता कर्णधार आणि फुटबाल जगतातील महान खेळाडू लिओनल मेस्सी 14 वर्षानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. मेस्सी मेस्सी 13 डिसेंबर रोजी कोलकात्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात करेल. त्याच दिवशी सायंकाळी तो हैदराबादला पोहोचेल. 14 डिसेंबरला मुंबई आणि 15 डिसेंबरला नवी दिल्ली येथे दौरा संपन्न होईल. अशातच मुंबईमध्ये होणाऱ्या मेस्सीच्या या कार्यक्रमाच्या तिकीटासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
लियोनेल मेस्सीचा मुंबईमधील कार्यक्रम 14 डिसेंबर 2025 रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5.00 वाजता सुरू होईल आणि रात्री उशिरापर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे. 30,000 हून अधिक चाहते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने, स्टेडियम फुटबॉल, दिवे आणि संगीताने झळाळून निघेल. कार्यक्रमाची सर्व तिकिटे डिजिटल आहेत आणि सुरक्षित प्रवेशासाठी QR कोडसह येतात. 12 वर्षांखालील मुले सवलतीच्या दरात प्रवेश घेऊ शकतात आणि दहा किंवा त्याहून अधिक लोकांसाठी ग्रुप बुकिंग देखील उपलब्ध आहे.
फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
28 नोव्हेंबर 2025 रोजी MCA ने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, 'District' व्यतिरिक्त इतर कोणत्याही अनाधिकृत स्त्रोतांकडून किंवा MCA अथवा आयोजकांची नक्कल करणाऱ्या खात्यांकडून खरेदी केलेली तिकीटे पूर्णपणे बनावट मानली जातील आणि त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
मेस्सीच्या चाहत्यांना तिकीट खरेदी करताना अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे. रिसोर्स वेबसाइट्स किंवा 'District' शी संलग्न नसलेल्या सोशल मीडिया खात्यांवरून खरेदी केलेली कोणतीही तिकीट गेटवर स्वीकारली जाणार नाही. याव्यतिरिक्त, MCA ने चाहत्यांना केवळ त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट (@mumbaicricketassoc) वरूनच माहिती घ्यावी, असे कळवले आहे. बनावट किंवा डुप्लिकेट अकाउंट्सच्या पोस्टकडे दुर्लक्ष करावे, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
तिकीट दरांमध्ये वाढ आणि अधिक स्लॉट उपलब्ध
मेस्सीच्या या दौऱ्यासाठी प्रचंड मागणी असल्याने, आयोजकांनी अतिरिक्त तिकीट स्लॉट खुले केले आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात तिकीट मिळवू न शकलेल्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. वानखेडेवरील या कार्यक्रमासाठी तिकीटांचे दर आता ₹७,०८० ते ₹२३,६०० च्या दरम्यान आहेत. या कार्यक्रमात मनोरंजन, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि मेस्सीच्या गौरवार्थ विशेष सादरीकरण यांचा समावेश असणार आहे. लाखो भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी मेस्सीला जवळून पाहण्याची ही 'वन्स-इन-अ-लाइफटाइम' संधी असल्याने, सुरक्षित आणि वैध तिकीट मिळवणे हेच यशस्वी अनुभवाचे गमक आहे.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: कोणीही लग्न करणार नाही, वडिलांना मारले टोमणे... स्मृती मानधनाचा धक्कादायक खुलासा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world