जाहिरात

Nehal Vadoliya: 'राजस्थान रॉयल्स'च्या खेळाडूने पाठवले 'हॉट' मेसेज; 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

Nehal Vadoliya Rajasthan Royals: आयपीएलमधील 'राजस्थान रॉयल्स' संघातील एका घटस्फोटीत क्रिकेटपटूने आपल्याला सोशल मीडियावर 'हॉट' आणि 'प्रेट्टी' असे मेसेज पाठवून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा नेहल वडोलीयाने केला आहे.

Nehal Vadoliya: 'राजस्थान रॉयल्स'च्या खेळाडूने पाठवले 'हॉट' मेसेज; 'तारक मेहता..' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

टेलिव्हिजन आणि ओटीटी विश्वातील परिचित चेहरा असलेली अभिनेत्री नेहल वडोलीया हिने क्रिकेट आणि मनोरंजन विश्वात खळबळ उडवून देणारा एक दावा केला आहे. 'सुनो इंडिया' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता, तिने आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सच्या एका क्रिकेटपटूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या क्रिकेटपटूने इन्स्टाग्रामवर थेट 'डीएम' करून आपल्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले.

"तो जास्त प्रसिद्ध नाही, पण..."

पॉडकास्ट दरम्यान जेव्हा नेहलला विचारण्यात आले की, कधी एखाद्या क्रिकेटपटूने तुला मेसेज केला आहे का? यावर तिने मिश्किलपणे "मी नाव घेऊ का?" असा उलट प्रश्न विचारला. त्यानंतर अधिक माहिती देताना ती म्हणाली, "तो खेळाडू क्रिकेट विश्वात इतका जास्त प्रसिद्ध नाही. तो आयपीएलमध्ये 'राजस्थान रॉयल्स' संघाकडून खेळतो आणि त्याचा घटस्फोट झालेला आहे."

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi: वैभवसमोर मोठा पेच; अलिशान कार जिंकली, पण एक खंत सतत सतावेल!)

नेहलने पुढे सांगितले की, तो क्रिकेटर तिच्या सोशल मीडिया स्टोरीजवर वारंवार प्रतिक्रिया द्यायचा. मेसेजमध्ये तो तिला "हॉट", "ब्युटीफुल" आणि "प्रिट्टी" अशा कमेंट्स करायचा. नेहलने सांगितलं की, "मी जर मेसेजला उत्तर दिले असते, तर त्याचे मेसेज येणे सुरूच राहिले असते. मला त्याच्याशी बोलायचेच नव्हते.  अखेर त्या क्रिकेटपटूला ब्लॉक केल्याचेही नेहलने सांगितलं.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तो क्रिकेटर कोण असू शकतो, याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

गुजराती अभिनेत्यावरही केले होते गंभीर आरोप

या क्रिकेटपटूच्या प्रकरणापूर्वी, अवघ्या काही दिवसांपूर्वीच नेहलने गुजराती अभिनेता करण जोशी याच्यावर इन्स्टाग्रामवर अनुचित आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता. नेहलने त्यांच्यातील संभाषणाचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

नेहलच्या मते, सुरुवातीला करणने ते मेसेज त्याच्या मित्राने पाठवल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्याच्या 'लालो' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते, असा पवित्रा त्याने घेतला. या प्रकरणात शांत राहण्यासाठी आणि पोस्ट डिलीट करण्यासाठी करणच्या ओळखीच्या लोकांकडून आपल्यावर दबाव आणला गेल्याचा आरोपही तिने केला.

(नक्की वाचा-  Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)

कोण आहे नेहल वडोलीया?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड वेब सीरिजमुळे नेहल वडोलीया हे एक अत्यंत लोकप्रिय नाव आहे. तिने 'गंदी बात 3', 'मस्तराम', 'ज्युली', 'दुनाली', 'इमली' आणि 'रसीले पडोसन' यांसारख्या अनेक गाजलेल्या सीरिजमध्ये काम केले आहे. याशिवाय, छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तिने 'बबिताजी'च्या 'नेहा' नावाच्या मैत्रिणीची एक छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com