Ravi Shastri On Vaibhav Sooryavanshi : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत भारताच्या ज्या युवा खेळाडूने प्रभावित केलं आहे,निश्चितच त्याचं नाव वैभव सूर्यवंशी आहे. या सीजनमध्ये खेळलेल्या शानदार इनिंगनंतर वैभवबाबत एका वेगळ्या स्तरावर चर्चा रंगली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वैभवच्या वयाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले,"वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.वयाचा काहीही फरक पडत नाही. वैभवला लवकरात लवकर भारताच्या टी-20 संघात सामील करण्यासाठी मी निवडकर्त्यांकडे विनंती करणार आहे".
"अनुभवी गोलंदाजांचा धुव्वा उवडतो.."
रवी शास्त्री यांनी 'द आयसीसी रिव्हू'वर म्हटलं,"वैभव आयपीएलमध्ये अनुभवी गोलंदाजांविरोधात ज्या आक्रमकपणाने खेळतो, ते दुर्लक्षीत करणं अशक्य आहे.जर तुम्ही एखाद्या युवा खेळाडूला प्रोत्साहित करत असाल आणि त्यांना लवकरात लवकर टीममध्ये सामील करायचं असेल, तर टी-20 फॉर्मेट यासाठी योग्य आहे. वैभव कोणत्याही गोष्टीत मागे नाही.सध्याच्या घडीला हा खेळाडू जगातील अनेक क्रिकेट संघामध्ये सहजपणे जागा बनवू शकतो".
नक्की वाचा >> Nashik News: नाशिकची आरोग्य यंत्रणा हादरली, 22 वर्षांनी मालेगावात घडली 'ती' भयानक घटना, महाराष्ट्र अलर्ट मोडवर
"जर वैभवची निवड झाली, तर.."
शास्त्री पुढे म्हणाले, "आर्यलँडच्या आगामी सीरिजमध्ये सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदापर्णासाठी एक चांगला मंच मिळू शकतो.जर त्याची निवड झाली,तर हा खेळाडू भारतासाठी डेब्यु करणारा आतापर्यंतचा सर्वात युवा खेळाडू बनेल. अनेक लोक म्हणतील की, तो पंधरा वर्षांचा आहे,16 चा आहे की 14 चा..मला याचा काहीही फरक पडत नाही. मी फक्त हेच पाहतो की, तो यावेळी ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे आणि तो त्याच्यापेक्षा दुप्पट वयाच्या खेळाडूंचा सामना करत आहे,ते पाहता मला वाटतं तो टीममध्ये सामील होण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. आयर्लंड आणि अन्य दौऱ्यांसाठी भारताच्या सीनियर टीममध्ये सामील केल्याची चर्चा आणखी वाढेल".