जाहिरात

Nashik News: नाशिकची आरोग्य यंत्रणा हादरली, 22 वर्षांनी मालेगावात घडली 'ती' भयानक घटना, महाराष्ट्र अलर्ट मोडवर

घटसर्प आजाराने मालेगावात सख्ख्या दोन भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येताच आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली आहे. पालकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे.

Nashik News: नाशिकची आरोग्य यंत्रणा हादरली, 22 वर्षांनी मालेगावात घडली 'ती' भयानक घटना, महाराष्ट्र अलर्ट मोडवर
Diphtheria In Nashik Malegaon

निलेश वाघ, प्रतिनिधी 

Diphtheria In Nashik : घटसर्प आजाराने मालेगावात सख्ख्या दोन भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येताच आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ उडाली आहे. पालकांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवून अशा आजाराने बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काबिल सुनील मदारी (5),सावंत सुनील मदारी (एक वर्ष)अशी मृत चिमुकल्यांची नावं आहेत.ते मालेगाव महापालिका क्षेत्रातील चाळीसगाव फाटा परिसरात सायन शिवारात राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत काबीलवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.त्याला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ताप, गळ्याला सूज व नाकातून रक्तस्त्राव होत होता.त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र गळ्यात तयार झालेल्या पडद्यामुळे  नळी टाकण्यास अडचण येत असल्याने त्याला व्हेंटिलेटर ठेवण्यात आले होते.मात्र त्याचे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.तर एक दिवस आधी याच आजाराने त्याचा एक वर्षाचा भाऊ सावंत सुनील मदारीचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा >> Pune News: हापूस, केशरही फिका पडेल, शेतकर्‍याने पिकवला कोकणलाही टक्कर देणारा 'हा' खास आंबा, राज्यभर चर्चा

मजुरी आणि भीक मागून उदरनिर्वाह करायचे

मदारी कुटुंब हे मुळचे अजमेर (राजस्थान) येथील असून गेल्या दोन वर्षांपासून ते मालेगावात राहत होते.मजुरी व भीक मागून ते उदरनिर्वाह करतात. आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या लसीकरण सर्वेक्षण आणि आरोग्य सप्ताहामध्ये "आशा" व "एएनएम" मदारी वस्तीमधील मातांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात आली. मात्र लसीकरण करून घेण्यात त्यांनी स्पष्ट नकार दिला.त्यामुळे या वस्तीवरील मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यांना ही बाधा झाली, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाय

दोन सख्ख्या भावांचा घटसर्प आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी पथके तयार करून वस्तीवर संशयित रुग्णांची शोध मोहीम सुरू करण्यात आली. तर मृत झालेल्या बालकांच्या संपर्कात आलेल्या  बालकांना लसीकरण तसेच 14 दिवसांचे रोग प्रतिबंधात्मक औषधोपचार सुरू करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Pune News: पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत..इंदापूरच्या ओंकारने सायकलवरून चक्क केदारनाथ गाठलं, थक्क करणारा Video

22 वर्षांनी शहरात आढळले घटसर्प रुग्ण

मालेगाव शहरात तब्बल 22 वर्षांनी घटसर्प या साथ रोगाचे रुग्ण आढळल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. तर आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. सन 2004 मध्ये घटसर्प आजाराचे रुग्ण आढळले होते.त्यावेळी महापालिकेच्या वाडिया रुग्णालयात या रुग्णावर उपचार करण्यात आले होते.त्यानंतर आता पुन्हा घटसर्प आजाराने डोके वर काढले आहे..


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com