जाहिरात

IND vs ENG: ऋषभ पंतचे एकाच सामन्यात 2 महारेकॉर्ड, 25 वर्षानंतर असा कारनामा करणारा ठरला पहिला फलंदाज

पंतने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत 556 चेंडूंवर 502 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55.77 आहे.

IND vs ENG: ऋषभ पंतचे एकाच सामन्यात 2 महारेकॉर्ड, 25 वर्षानंतर असा कारनामा करणारा ठरला पहिला फलंदाज

Rishabh Pant vs England: टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावातही दमदार शतक झळकावले. यासह, पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत त्याच्या बॅटमधून शतकी खेळी पाहायला मिळाली. पंत दुसऱ्या डावात 118 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पण तोपर्यंत त्याने आपले काम केले होते. ऋषभ पंतने 130 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार ठोकले. हे पंतचे कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या शतकासह पंतने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंड विरुद्ध एकाच सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक झळकवणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. इंग्लंड विरुद्ध दोन्ही डावात आता पर्यंत कोणत्याही फलंदाजाने शतक झळकावले नव्हते. तो कारनामा  ऋषभ पंतने करुन दाखवला आहे. या सामन्यात केएल राहुलनेही दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी केली. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध आपल्या आक्रमक शैलीने एक आणखी नवा विक्रम रचला आहे.

ट्रेंडिंग बातमी - ENG vs IND 1st Test, Day 4 Live Score: दुसऱ्या डावातही रिषभ पंतचे शतक, भारताकडे भक्कम आघाडी

पंतने इंग्लंड विरुद्ध आतापर्यंत 556 चेंडूंवर 502 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 55.77 आहे. तर   स्ट्राइक रेट 90.28 इतका आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, पंतने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध 28 षटकार मारले आहेत.  2000 सालानंतर  कोणत्याही फलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध मारलेले हे सर्वाधिक षटकार आहेत. त्यामुळे 25 वर्षानंतर त्याने हा आणखी एक कारनामा करून दाखवला आहे. हा ही विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. 

ट्रेंडिग बातमी - Crime News: 50 वर्षाचा शिक्षक, 17 वर्षांची विद्यार्थीनी, 1 वर्षापासून अत्याचार अन् शेवटी...

कसोटीमध्ये पंत विरुद्ध इंग्लंडचे फिरकी गोलंदाज:

चेंडू: 556
धावा: 502
सरासरी: 55.77
स्ट्राइक रेट: 90.28
षटकार: 28 (साल 2000 नंतर सर्वाधिक षटकार )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com