Badlapur Municipal Corporation Latest News : बदलापूर नगर पालिकेतील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 6 टक्के लाचेची मागणी केली. रस्ते कामाचे बिल आणि सुरक्षा ठेव मोकळी करण्यासाठी या अधिकाऱ्याने लाच मागितल्याचं सांगितलं जातंय.या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकाऊंटन्ट विकास चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आणखी काही अधिकारी अडकण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेतील कंत्राटदारांकडे बिले देण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जात होती, असे आरोप होते. ही माहिती उघडकीस आल्यावर संबंधीत अधिकाऱ्याला कामावरून काढूनही टाकले होते.दरम्यान, तक्रारदार व्यक्ती त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून रस्ते बांधणीचं काम करते. त्यांना बदलापूर नगरपरिषदेच्या एकूण 77 विकासकामांचे कंत्राट मिळाले आहे. याद्वारे त्यांची कामेही जोरात सुरु आहेत.
नक्री वाचा >> Palghar News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी! एकाच कुटुंबातील 16 जणांसोबत घडलं सर्वात भयंकर
22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा
परंतु, या कामांपैकी दोन देयकांची 17 लाख 44 हजार रुपये, तसच पूर्वी केलेल्या कामाची सुरक्षा अनामत रक्कम (Security Deposite) 4 लाख 99 हजार रुपये,अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती.या रक्कमेच्य मोबदल्यात 6 टक्के प्रमाणे 1 लाख 34 हजार 500 रुपयांच्या लाचेची मागणी लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी केली होती, अशी माहितीही तक्रारीत होती.
नक्की वाचा >> Sambhajinagar News: सहलीला जाणाऱ्या 9 मित्रांसोबत नको ते घडलं, 3 जणांचा करुण अंत, 6 जण कसेबसे वाचले
त्यानंतर तक्रारदाराने या लाचेच्या मागणी विरोधात 9 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची तातडीनं पडताळणी करण्यात आली. त्यानंतर विकास चव्हाण यांनी कामाचा मोबदला म्हणून 6 टक्के रक्कमेची मागणी केल्याचे उघडकीस आले,अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
नक्की वाचा >>
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world