जाहिरात

IND vs WI, T20 World Cup 2026: सेमी फायनलआधी गांगुलीनं घेतली गंभीरची शाळा, म्हणाला, "इंग्लंडला हरवायचंय मग.."

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

IND vs WI, T20 World Cup 2026: सेमी फायनलआधी गांगुलीनं घेतली गंभीरची शाळा, म्हणाला, "इंग्लंडला हरवायचंय मग.."
Saurav Ganguly On Team India

Saurav Ganguly on T20 World Cup Semi Final, IND vs ENG: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संजू सॅमसनच्या स्फोटक खेळीनंतर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "संजूने भारतासाठी सतत व्हाईट बॉल क्रिकेट खेळलं पाहिजे", असं गांगुलीचं म्हणणं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमी फायनल सामन्याआधी टीम इंडियाला गांगुलीने मोठ्या सूचना दिल्या आहेत. "इग्लंड एक चांगला संघ आहे आणि आपल्याला त्यांच्याविरोधात बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल.त्यामुळे भारतीय संघाने परिस्थितीनुसार सामन्यात योग्य निर्णय घेतले पाहिजेत", असं गांगुलीनं म्हटलं आहे.

भारत सलग तीन वेळा सेमी फायनलमध्ये

मागील वर्ल्डकप 2024 मध्ये झालेल्या शेवटच्या सेमी फायनलमध्ये, भारताने गुयानाच्या प्रोविडेंसमध्ये फिरकीला सपोर्ट करणाऱ्या पिचवर इंग्लंडचा सामना केला होता. त्यानंतर भारताने फिरकीची जादू दाखवत इंग्लंडच्या मिडल ऑर्डरला उद्ध्वस्त केलं होतं. भारतीय संघ सहाव्यांदा वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.विशेष म्हणजे भारत सलग तीन वेळा सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. मागील दोन्ही वेळा भारतीय संघ इंग्लंड विरोधात सेमी फायनल खेळली आहे.

नक्की वाचा >> Pune News: पुणेकरांनो घरातून बाहेर पडताना ही चूक अजिबात करू नका, महापालिकेनं 1408 नागरिकांवर केली मोठी कारवाई

अशाप्रकारे भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा सेमी फायनलचा सामना होणार आहे.मागील दोन सामन्यांच्या स्कोअरकार्डवर नजर मारली तर,भारत किंवा इंग्लंड ज्या संघानेही सेमी फायनल जिंकली आहे, पुढे तोच संघ चॅम्पियन बनला आहे.टी-20 वर्ल्डकप 2022 च्या सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगला होता.

नक्की वाचा >> T20 WC Semifinal: टी ट्वेंटी वर्ल्डकपचे सेमीफायनलचे संघ ठरले! टीम इंडिया कुणाशी भिडणार? 'इथे' रंगणार थरार

एडिलेडमध्ये झालेल्या या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाने 6 विकेट्सवर 168 धावा केल्या होत्या. तर जॉस बटरलच्या कॅप्टन्सीत उतरलेल्या इंग्लंड संघाने 16 षटकात बिनबाद 170 धावा करून सामना खिशात घातला होता. फायनलमध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्डकप जिंकलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com