जाहिरात

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीसाठी 3 नंबर का निवडला? खास कारण झालं उघड

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीवर 3 नंबर का निवडला? याचं कारण उघड झालं आहे.

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीनं टीम इंडियाच्या जर्सीसाठी 3 नंबर का निवडला? खास कारण झालं उघड
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला अखेर टीम इंडियाची जर्सी मिळाली आहे.
मुंबई:

Vaibhav Sooryavanshi: क्रिकेट विश्वात सध्या वैभव सूर्यवंशी या 15 वर्षांच्या तरुण खेळाडूची सर्वाधिक चर्चा आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी-20 सीरिजसाठी रवाना झाला असून वैभव देखील या संघासोबत गेला आहे. नुकताच बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वैभवला टीम इंडियाची जर्सी देण्यात आली. ही जर्सी पाहताना वैभव कमालीचा भावुक झाला होता, पण या जर्सीवरील एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वैभवच्या जर्सीवर 3 नंबर लिहिलेला असून या नंबरमागची एक अत्यंत रंजक आणि भावनिक गोष्ट आता समोर आली आहे.

भारतीय संघाचे थ्रोडाउन स्पेशलिस्ट रघु जेव्हा वैभवसाठी टीम इंडियाची जर्सी घेऊन आले, तेव्हा वैभवने आदराने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. बॉक्समधून जर्सी काढल्यानंतर त्यावर स्वतःचे नाव आणि 3 नंबर पाहून वैभव भावुक झाला होता. क्रिकेट रसिकांमध्ये आता हा प्रश्न चर्चिला जात आहे की सचिन तेंडुलकरचा 10 नंबर, विराट कोहलीचा 18 नंबर आणि रोहित शर्माचा 45 नंबर जसा चाहत्यांच्या मनावर कोरला गेला आहे, तसाच वैभवने हा 3 नंबर का निवडला? हा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे.

का निवडला 3 नंबर?

वैभव सूर्यवंशीने टीम इंडियाच्या जर्सीवर 3 नंबर निवडण्यामागे त्याची आई आहे. वैभवने जेव्हा आपल्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती, तेव्हा त्याचा जर्सी नंबर 12 असा होता. रायझिंग स्टार्स आशिया कप दरम्यान जेव्हा वैभवला त्याच्या 3 नंबरच्या जर्सीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने हसत यामागचे गुपित सांगितले.

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi नंतर बिहार क्रिकेटमध्ये आलं दुसरं वादळ!15 वर्षांच्या मुलीनं वन-डे मॅचमध्ये केले 306 रन्स ! )

 वैभवच्या आईने त्याला सल्ला दिला होता की, 12 या अंकाची बेरीज (1 + 2) केली तर 3 हा आकडा येतो. त्यामुळे दोन अंकी नंबर वापरण्याऐवजी थेट सिंगल डिजिट असणारा 3 नंबर जर्सीवर वापर. आईच्या याच सल्ल्यानंतर वैभवने 3 नंबरची जर्सी वापरण्यास सुरुवात केली आणि हा नंबर त्याच्यासाठी लकी ठरला.

आयपीएल आणि अंडर 19 मधील जर्सी कनेक्शन

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना वैभव 12 नंबरची जर्सी घालतो, ज्याची बेरीज 3 होते. म्हणूनच जेव्हा भारतीय सीनियर संघाकडून खेळण्याची संधी आली, तेव्हा वैभवने थेट आपल्या जर्सीवर 3 नंबर लिहून घेतला. यापूर्वी 2025 मध्ये जेव्हा वैभव सूर्यवंशी भारतीय अंडर 19 संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता, तेव्हा त्याने इंग्लंड अंडर 19 विरुद्धच्या सामन्यात 18 नंबरची जर्सी घातली होती. 

विराट कोहली देखील 18 नंबरची जर्सी घालत असल्यामुळे त्यावेळी वैभवच्या जर्सीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. आता आगामी मालिकेत वैभव 3 नंबरच्या जर्सीत मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com