जाहिरात

RR vs SRH : दिग्गजांना संपूर्ण करिअरमध्ये एकदाही जमलं नाही, 'तो' कारनामा वैभव सूर्यवंशीने 3 वेळा केला

वैभवने चौकार षटकारांचा पाऊस पाडणं सुरुच ठेवलं. वैभवने 37 चेंडूत 103 धावांचं वादळी शतक ठोकलं. यामध्ये 5 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे.

RR vs SRH : दिग्गजांना संपूर्ण करिअरमध्ये एकदाही जमलं नाही,  'तो' कारनामा वैभव सूर्यवंशीने 3 वेळा केला
Vaibhav Suryavanshi latest News

SRH vs RR, Vaibhav Sooryavanshi : भारतीयच नाही, तर आता विश्व क्रिकेटचा सुपर किड बनला आहे वैभव सूर्यवंशी..आज शनिवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत वैभवने 15 चेंडूतच अर्धशतक ठोकलं.त्यानंतर वैभवने चौकार षटकारांचा पाऊस पाडणं सुरुच ठेवलं. वैभवने 37 चेंडूत 103 धावांचं वादळी शतक ठोकलं. यामध्ये 5 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश आहे. अशातच वैभवने आयपीएलच्या एका हंगामात असा इतिहास रचला आहे,जो अनेक दिग्गज फलंदाज त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये करू शकले नाहीत. दरम्यान, आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 228 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे हैदराबादपुढे विजयासाठी 229 धावांचं तगडं आव्हान होतं. परंतु, इशान किशन (74) आणि अभिषेक शर्माच्या (57) अर्धशतकाच्या जोरावर हैदराबाद संघाने राजस्थानचा पराभव केला. हैदराबादने 18.3 षटकात 229 धावा करून हा सामना पाच विकेट्सने जिंकला. 

छोट्या वैभवचा मोठा धमाका

वैभवने धावांचा पाऊस पाडून तुफानी शतक तर ठोकलंच.पण त्याने 15 चेंडूत अर्धशतक ठोकून एक विशेष विक्रमाला गवसणी घातली. वैभवने तीनवेळा 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे. जे बड्या क्रिकेटर्सला संपूर्ण करिअरमध्ये करता आलं नाही. वैभवने त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच हा मोठा कारनामा केला आहे.वैभवने हैदराबादआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात झालेल्या सामन्यांमध्ये 15 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यात खळबळ! जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू, अपघात की घातपात?

जैक फ्रेजर-मुकगर्क दुसऱ्या नंबरवर

ऑस्ट्रेलियाचा तरुण फलंदाज जैक फ्रेजर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जैकने वर्ष 2024 मध्ये हैदराबाद आणि मुंबईच्या विरोधात 15 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला. तो सुद्धा आयपीएलमध्ये दोन वेळा असा कारनामा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.

नक्की वाचा >> Pune News: बागेश्वर बाबांविरोधात शिवप्रेमी भडकले, पुण्यात संतप्त आंदोलन, शिवरायांबाबत केलं होतं खळबळजनक विधान

या फलंदाजांनी केला मोठा कारनामा

आयपीएलमध्ये फक्त तीन फलंदाज असे आहेत,ज्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये एकदा 15 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला. यूसफ पठाण (2014) हैदराबाद, सुनील नरेन (2017)आरसीबी आणि निकोलस पूरन (2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात 15 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा कारनामा केला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com