जाहिरात

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा धमाका! दिग्गजांना धक्का देत बनला 'सिक्सर किंग'; वर्ल्ड रेकॉर्डने क्रिडाविश्व थक्क

सामन्यादरम्यान त्याने आपल्या १०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. आकडेवारीचा विचार करता, वैभवच्या नावावर २९ सामन्यांत ४०.७५ च्या सरासरीने ११४१ धावा जमा आहेत. 

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचा धमाका! दिग्गजांना धक्का देत बनला 'सिक्सर किंग'; वर्ल्ड रेकॉर्डने क्रिडाविश्व थक्क

Vaibhav Sooryavanshi World Record: क्रिडाविश्वात सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीचा धमाका पाहायला मिळत असून तो एकापाठोपाठ एक रेकॉर्ड करत आहे. आता भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशी याने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना एक ऐतिहासिक मैलाचा दगड पार केला आहे.

RR vs GT : गुजरात टायटन्सचा राजस्थानवर 'रॉयल'विजय,सूर्यवंशी बाद होताच राजस्थानच्या संघाची झाली दाणादाण

वैभव सूर्यवंशीचा धमाका

टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार ठोकणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम अवघ्या २९ डावांमध्ये करून दाखवला आहे. या कामगिरीसह त्याने ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंहचा विक्रम मोडित काढला असून, जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या ताज्या लढतीत वैभवने आपल्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. अवघ्या १६ चेंडूत २२५ च्या स्ट्राईक रेटने ३६ धावा करताना त्याने ३ षटकार आणि ३ चौकार लगावले. याच सामन्यादरम्यान त्याने आपल्या १०० षटकारांचा टप्पा पूर्ण केला. आकडेवारीचा विचार करता, वैभवच्या नावावर २९ सामन्यांत ४०.७५ च्या सरासरीने ११४१ धावा जमा आहेत. 

विशेष म्हणजे, त्याने टी-२० मध्ये ४ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. ​आयपीएल कारकिर्दीतही वैभवची बॅट तळपत आहे. त्याने १८ सामन्यांत ३८.४४ च्या सरासरीने ६९२ धावा केल्या असून यात दोन शतकांचा समावेश आहे. सर्वात कमी डावात १०० षटकार मारणाऱ्यांच्या यादीत आता वैभव (२९ डाव) पहिल्या, तर करणबीर सिंह (३३ डाव) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार मारणारे जगातील अव्वल ५ फलंदाज:

  • २९ डाव - वैभव सूर्यवंशी
  • ३३ डाव - करणबीर सिंग
  • ४१ डाव ​​- मोहम्मद वसीम
  • ५२ डाव - मोहम्मद तन्वीर
  • ५२ डाव - प्रियांश आर्य

दरम्यान, त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, वैभव सूर्यवंशीने यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १८ सामने खेळले आहेत. त्या १८ डावांमध्ये त्याने ३८.४४ च्या सरासरीने ६९२ धावा केल्या आहेत. वैभवने आयपीएलमध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफचे स्वप्न भंगणार, सलग चौथ्या विजयासह KKR चमत्कार करणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com