जाहिरात

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफचे स्वप्न भंगणार, सलग चौथ्या विजयासह KKR चमत्कार करणार?

अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर वैभव अरोरा, सुनील नरेन आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत दिल्लीच्या धावसंख्येला लगाम घातला.

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सचे प्ले ऑफचे स्वप्न भंगणार,  सलग चौथ्या विजयासह KKR चमत्कार करणार?
सौजन्य IPL
  • दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते
  • केकेआरने फिल अॅलन आणि केमेरॉन ग्रीन यांच्या शतकी भागीदारीमुळे १५ ओव्हर्समध्ये विजय मिळवला
  • फिल अॅलनने ४७ चेंडूत १० षटकारांसह शतक पूर्ण करून कोलकात्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

 DC vs KKR Match:दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) समोर विजयासाठी 143 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 143 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरूवात चांगली झाली नाही. अजिंक्य रहाणे स्वस्त्यात बाद झाला. तर त्याच्या पाठोपाठ अंगकृष्ण रघुवंशीही फार काही करून शकला नाही. मात्र त्यानंतर फिल अॅलन आणि केमेरॉन ग्रीन यांनी डाव सावरला. शिवाय दिल्लीच्या बॉलर्सवर हल्ला ही चढवला. दोघांनी शतकी भागीदारी केली. कोलकाताने या सामन्यात दिल्लीचा 15 व्या ओव्हरमध्येच पराभव केला. 

फिल अॅलनने धुवाधार बॅटींग केली. त्याने आपल्या खेळीत 10 षटकारांची आतषबाजी केली. त्याने आपले शतक ही पुर्ण केले. त्याने 47 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले. तर दुसऱ्या बाजून केमेरॉन ग्रीनची त्याला चांगली साथ मिळाली. त्याने 33 धावा केल्या.  शेटी 15 ओव्हर्समध्ये कोलकाताने विजयाचे लक्ष गाठले. कोलकाताने दिल्लीवर 8 विकेटने विजय मिळवला. कोलकात्याने 2 विकेटवर 147 धावा केल्या. या पराभवामुळे दिल्लेचे प्ले ऑफ मधील स्थान जवळपास संपूष्टात आले आहे. तर कोलकाताला एक संधी मिळाली आहे.   

त्या आधी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात समाधानकारक झाली. श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांका आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. निसांकाने 50 धावांची झुंजार खेळी केली, मात्र केएल राहुल 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर दिल्लीची फलंदाजी गडगडली. नितीश राणा (8), समीर रिझवी (3) आणि ट्रिस्टन स्टब्स (2) या खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे दिल्लीला फक्त 143 धावाच करता आल्या. 

नक्की वाचा - Suryakumar Yadav: सुर्याच्या घरी 10 वर्षानंतर पाळणा हलला! इंस्टावर पोस्ट टाकत चाहत्यांना दिली गोड बातमी

मधली फळी अपयशी ठरल्यानंतर आशुतोष शर्माने दिल्लीचा डाव सावरला. त्याने 28 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे दिल्लीला 20 षटकांत 8 बाद 142 धावांपर्यंत मजल मारता आली. केकेआरच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. अनुकूल रॉय आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले, तर वैभव अरोरा, सुनील नरेन आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेत दिल्लीच्या धावसंख्येला लगाम घातला.

नक्की वाचा - विराट कोहली, प्रियांका चोप्रा, रोनाल्डोसह अनेक सेलिब्रेटींना दणका! इंस्टाग्राममुळे झाला जबरदस्त तोटा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com