IPL 2025 : जागा 4, संघ 7; Play Offs चं तिकीट मिळवायच्या शर्यतीत असलेल्या संघांसमोर काय आहेत निकष?

10 संघांपैकी चेन्नई सुपरकिंग्ज, सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे तीन संघ याआधीच प्ले-ऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती शांत झाल्यानंतर आता स्थगित झालेला आयपीएलचा हंगाम 17 मे पासून सुरु होणार आहे. अखेरच्या टप्प्यात आलेल्या स्पर्धेत सध्या Play offs मध्ये स्थान मिळवण्याची शर्यत सुरु झाली आहे.

हे ही वाचा - India-Pakistan Tension निवळलं, IPL चा स्थगित हंगाम पुन्हा सुरु होणार; 6 ठिकाणी होणार सामने

10 संघांपैकी चेन्नई सुपरकिंग्ज, सनराईजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे तीन संघ याआधीच प्ले-ऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. उर्वरित सातही संघांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. पाहूयात काय आहेत प्रत्येक संघासमोरचे निकष....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

1) गुजरात टायटन्स - आताचे गुण (16), पोहचू शकतील इतके गुण (22)

राहिलेले सामने - दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजाएंट्स, चेन्नई सुपरकिंग्ज

सध्याच्या घडीला गुजरात टायटन्सचा संघ प्ले-ऑफ्समध्ये जागा मिळवण्यासाठी फक्त एक विजय दूर आहे. त्यामुळे हातात तीन सामने शिल्लक असल्यामुळे गुजरातचा संघ हा प्ले-ऑफमध्ये जागा मिळवणार हे निश्चीत मानलं जातंय.

2) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - आताचे गुण (16), पोहचू शकतील इतके गुण (22)

राहिलेले सामने - कोलकाता नाईट रायडर्स, सनराईजर्स हैदराबाद, लखनऊ सुपरजाएंट्स

गुजरातप्रमाणे RCB चा संघही प्ले-ऑफमध्ये जागा मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे RCB चे उर्वरित तीन पैकी दोन सामने हे घरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन स्थानांवर राहण्यासाठी RCB चा रस्ता हा तुलनेने सोपा मानला जातोय.

Advertisement

3) पंजाब किंग्ज्स - आताचे गुण (15), पोहचू शकतील इतके गुण (21)

राहिलेले सामने - राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स

पंजाबचा दिल्लीविरुद्धचा सामना धर्मशाला येथील मैदानात मध्यातच रद्द करावा लागला होता. नवीन वेळापत्रकानुसार हा सामना पुन्हा नव्याने खेळवण्यात येणार आहे. पंजाबला उर्वरित तीन पैकी दोन सामन्यांत विजय मिळवणं आवश्यक झालेलं आहे. त्यामुळे प्ले-ऑफसाठी पंजाबला संघर्ष करावा लागू शकतो.

4) मुंबई इंडियन्स - आताचे गुण (14), पोहचू शकतील इतके गुण (18)

राहिलेले सामने - पंजाब किंग्ज्स, दिल्ली कॅपिटल्स

गुजरातविरुद्ध सामन्यात मुंबईला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे प्ले-ऑफचं तिकीट हवं असेल तर मुंबईला उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. एकाही सामन्यात मुंबईचा पराभव झाला तर त्यांचा प्ले-ऑफचा रस्ता खडतर होऊ शकतो.

Advertisement

5) दिल्ली कॅपिटल्स - आताचे गुण (13), पोहचू शकतील इतके गुण (19)

राहिलेले सामने - गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज

दिल्ली कॅपिटल्सला प्ले-ऑफचं तिकीट मिळवायचं असेल तर उर्वरित तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवणं अनिवार्य आहे. एकाही सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर त्यांचं आव्हान संकटात येऊ शकतं.

6) कोलकाता नाईट रायडर्स - आताचे गुण (11), पोहचू शकतील इतके गुण (15)

15 गुणांच्या जोरावर प्ले-ऑफमध्ये चौथ्या स्थानावर येण्याची कोलकाता नाईट रायडर्सला अजुनही संधी आहे. परंतू यासाठी त्यांना आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. परंतु इथेच कोलकाताचं गणित पूर्ण होत नाहीये, प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकण्यासोबत कोलकात्याला पंजाबने आपले उर्वरित तिन्ही सामने गमवावेत अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

Advertisement

7) लखनऊ सुपरजाएंट्स - आताचे गुण (10), पोहचू शकतील इतके गुण (16)

राहिलेले सामने - सनराईजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

प्ले-ऑफच्या तिकीटासाठी लखनऊलाही आपले उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. परंतु त्यांचं कामही यावर पूर्ण होणार नाही. प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क व्हावं यासाठी लखनऊला मुंबई आणि दिल्लीच्या संघाने उर्वरित सामन्यांत एकापेक्षा जास्त सामना जिंकू नये अशी प्रार्थना करावी लागणार आहे.

हे ही वाचा - RCB चं नशिबच फुटकं, आधी स्पर्धेला स्थगिती आता 'या' गोष्टीने वाढवली चिंता

Topics mentioned in this article