- ओमकार तारमळे हा शहापूरच्या दुर्गम भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण हैदराबाद सनराईजर्स कडून खेळणार
- प्रशिक्षक नरेंद्र दिवाणे यांनी ओमकारच्या प्रतिभा ओळखून त्याला प्रॅक्टिससाठी प्रेरित केले
- आर्थिक अडचणी असूनही ओमकारने सातत्याने मेहनत घेतली आणि मुंबई प्रिमिअर लिगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली
IPL 2026 Auction: IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये बड्या बड्या खेळाडूंवर मोठ मोठी बोली लागली. पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान या सारखे खेळाडू अनसोल्ड राहातात की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण शेवटच्या क्षणाला त्यांना घेतले गेले. एकीकडे लियाम लिव्हिंगस्टोन,कॅमरून ग्रीन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा या खेळाडूंवंर कोट्यवधींची बोली लागली होती. त्याच वेळी एक असा खेळाडू होता त्याचं ही नशिब चमकलं. त्याचं नाव आहे मराठमोळा ओमकार तारमळे. शहापूर सारख्या दुर्गम भागातल्या या अन् कॅप खेळाडूला हैदराबाद सनराईजर्स संघानं हेरलं. त्याला 30 लाखात खरेदी केलं. ओमकारची मेहनत, चिकाटी अन् जिद्द कामी आली. त्याचे कुटुंबीय आणि त्याचे प्रशिक्षक नरेंद्र दिवाणे हे भारावून गेले आहेत. ओमकारच्या संघर्षाला या निवडीनं एक दिशा मिळाली.

ओमकार तारमळे हा सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. त्याचे वडील शेती करतात. शहापूरच्या शेरे या छोट्याश्या गावात त्याचं साधं घर आहे. घरची स्थिती हालाकीची. वडील शेती करून जे काही कमवतील त्यावरच त्याचं घर शिक्षण चालतं. तो गावातल्या क्रिकेट टीमध्ये टेनिस बॉलवर खेळायचा. तो सर्व प्रथन त्याचे कोच असलेल्या नरेंद्र दिवाणे यांच्या नजरेत आला. ते स्वत: रेल्वेकडून खेळतात. त्यांनी ए डीव्हीजनमध्ये ही खेळले आहेत. त्यांची नजर ओमकारवर पडली. त्याची उंची, त्याची बॉलिंग करण्याची स्टाईल त्यांना भावली. त्यांनी त्याला आपल्याकडे प्रॅक्टीलला येण्यास सांगितले. त्यासाठी त्यांच्या घरच्यांची ही दिवाणे यांनी समजूत घातली. घरची स्थिती हालाकीची होती. त्यामुळे पुढे काय होईल असा प्रश्न ओमकारच्या वडीलांना सतावत होता. त्यावेळी नरेंद्र दिवाणे यांनी त्यांना विश्वास दिला. दोन वर्ष त्याला द्या त्यानंतर पाहा असा सल्ला ही दिला.
त्यानुसार ओमकारच्या कुटुंबीयांनी त्याला परवानगी दिली. तो नियमित प्रॅक्टीस करू लागला. कमी वेळात त्याने वेगवान प्रगती केली. त्याच्या फिटनेसवर काम करण्यात आलं. त्याच्या रनअप आणि अॅक्शनवर ही काम करण्यात आलं. त्यात तो जबरदस्त परफॉर्म करून लागला असं नरेंद्र दिवाणे यांनी सांगितलं. त्याच काळात त्याला टेनिस क्रिकेट खेळू नको असंही सांगितलं गेलं. एकीकडे क्रिकेट सुरू असताना त्याचं दुसरीकडे कॉलेजही सुरू होतं. तो कुर्ल्यात शेट्टी कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिकत ही आहे. त्यामुळे कॉलेज अन् क्रिकेट याचा समन्वय त्याने साधला होता. यात त्याला प्रशिक्षकांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांची ही साथ मिळाली. पोटाल चिमटा काढून ओमकारच्या वडीलांनी त्याला क्रिकेटसाठी सपोर्ट केला.
IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी
ओमकारच्या घरची परिस्थिती तेवढी चागंली नव्हती. वडील शेतकरी आहेत. त्यातूनच त्याचं घर चालतं. एक वर्ष तो सतत मेहनत घेत होता. त्याच वेळी वडीलांना पैशांची चिंता भेडसावत होती. ते आर्थिक दृष्ट्या तेवढे स्टेबल नव्हते. वडील नेहमी बोलायचे कसं होणार. पण त्यांनीही हिंम्मत हरली नाही. त्यांनी मुलाच्या मागे खंबीर पणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. ओमकार खेळाचा आनंद घेत होता. त्याच वेळी तो त्रिपूरा इथं ही खेळायला गेला होता. पण त्यानंतर तो परत मुंबईत आला. पुढे तो मुंबईतल्या क्लबसाठी खेळू लागला. मुंबई प्रिमिअर लिगमध्ये त्यांनी आपल्या कामगिरीची चमक दाखवली. पुढे पुरूषोत्तम शिल्डमध्ये ओमकार हा सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर ठरला आहे.
IPL 2026 Auction : पृथ्वी शॉ ला साईबाबा पावले ! दोन वेळा निराशा पण, शेवटच्या क्षणी या टीमनं दाखवला विश्वास
आता तो मुंबईच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावत आहे. संभाव्य संघात त्याची निवड होण्याची दाट शक्यता असल्याचे त्याचे कोच नरेंद्र दिवाणे यांनी सांगितले. ज्या वेळी आयपीएल 2026 चे ऑक्शन सुरू होते त्यावेळी ओमकार गावातल्या मंदिरात होता. निवड होईल की नाही याची चिंता त्याला होती. पण नशिबाने आणि त्याच्या मेहनतीने त्याला साथ दिली. ओमकारची हैदराबाद संघाने खरेदी केली. त्यानंतर त्याने त्याच्या कोचना फोन केला होता. थँक्स हा त्याचा पहिला शब्द होता. त्यावेळी तो भावूक ही झाला होता. कोट दिवाणे यांनीही त्याचं अभिनंदन केलं. खेळावर आता अधिक लक्ष दे असा सल्ला ही दिला. नरेंद्र दिवाणे यांनी यावेळी सांगितले की आयपीएल जगातली मोठी लिग आहे. अशा लिगमध्ये हैदराबाद सारख्या टीम बरोबर ओमकारला खेळायला भेटत आहे ही मोठी गोष्ट आहे. या संपूर्ण हंगामात तो दिग्गज खेळाडूं सोबत राहाणार आहे. त्यांच्याकडून त्याला खूप शिकायला मिळणार आहे. हा त्याच्या आयुष्यातला टर्निंग पाँईंट असल्याचं ही त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world