जाहिरात

US-Iran War: होर्मुजमध्ये नाकाबंदी,सर्व जहाजे अडकणार,भारतालाही बसणार फटका? ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

'ही नाकाबंदी सर्व प्रकारच्या जहाजांवर लावण्यात आली आहे. या जहाजांवर कोणत्याही देशाचा झेंडा असो, ही नाकाबंदी सुरु राहणार',अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी केली आहे.

US-Iran War: होर्मुजमध्ये नाकाबंदी,सर्व जहाजे अडकणार,भारतालाही बसणार फटका? ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा
Donald Trump On Iran War

Donald Trump On Iran War : पश्चिम आशियाई युद्धाच्या झळा अनेक देशांना बसल्या आहेत. अशातच अमेरिका-इराण युद्धाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी होर्मुज सामुद्रधुनीच्या मध्य-पूर्व ओमान खाडी आणि अरब महासागरात नाकाबंदी सुरू केली आहे.ही नाकाबंदी सर्व प्रकारच्या जहाजांवर लावण्यात आली आहे. या जहाजांवर कोणत्याही देशाचा झेंडा असो, ही नाकाबंदी सुरु राहणार,अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी नाकाबंदीची घोषणा करत म्हटलंय की, इराणचं नौदल समुद्राच्या तळाशी बुडालं आहे. संपूर्ण पणे नष्ट झालं आहे-158 जहाज. आम्ही त्या काही जहाजांवर हल्ला केला नाही, जे त्यांना वेगवान हल्ला करणारी जहाजं म्हणतात. कारण आम्हाला ती जहाजं धोकादायक वाटली नाहीत. जर यापैकी कोणतंही जहाज आमच्या नाकाबंदी जवळ येत असेल,तर त्याला तातडीनं नष्ट करण्यात येईल. समुद्र किंवा महासागराच्या मार्गाने अमेरिकेत येणाऱ्या 98.2 टक्के ड्रग्ज तस्करी थांबवण्यात आली आहे.  परवानगीशिवाय नाकाबंदी परिसरात प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर निघणाऱ्या कोणत्याही जहाजाला थांबवण्यात येईल. त्या जहाजाचा मार्ग बदलण्यात येईल आणि त्याला जप्त केलं जाऊ शकतं.

नक्की वाचा >> Praful Hinge, RR vs SRH : एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स, 3 फलंदाज शून्यावर बाद, मराठमोळा प्रफुल हिंगे आहे तरी कोण?

इराणने दिला मोठा इशारा

दुसरीकडे इराणच्या प्रेस टीव्हीने एक्सवर ट्वीट केलं आहे की,इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल सय्यद मजीत इब्र रजा यांनी म्हटलंय की,आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरं जायला तयार आहोत. आमचं डिफेन्स सिस्टम पूर्णपणे सतर्क आहे. शत्रूच्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमकतेला कठोर उत्तर दिलं जाईल.

नक्की वाचा >> Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत कोण? रोहित पवारांचं ट्वीट व्हायरल," गडकरी साहेबांनी.."

चीननेही अमेरिकेला दिला हा इशारा

डेली इराण न्यूजने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये चीनचे संरक्षण मंत्री एडमिरल डोंग जून यांनी म्हटलंय की, इराणसोबत आमचं व्यापार आणि ऊर्जा संबंधीत करार आहे.आम्ही आशा करतो की,इतर लोकांनी आमच्या प्रकरणात लक्ष देऊ नये.होर्मुज सामुद्रधुनी आमच्यासाठी खुलं आहे. चीन अमेरिकेला इशारा देत असल्याचं डेली इराण माध्यमांनी म्हटलं आहे. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com