Anshul Kamboj: आयपीएलच्या मेगा ऑक्शनला (IPL 2025 Mega Auction) काही दिवसच शिल्लक आहेत. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी फास्ट बॉलर अंशुल कंबोजनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीच्या पाचव्या राऊंडमध्ये हरियाणा विरुद्ध केरळ या मॅचमध्ये अंशुलनं एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेतल्या. त्यानं 49 रन देत केरळच्या सर्व 10 जणांना आऊट केलं.
रणजी स्पर्धेच्या इतिहासात एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेणारा अंशुल हा तिसरा बॉलर आहे. यापूर्वी बंगालच्या प्रेमंगशू चटर्जी (10/20, बंगाल विरुद्ध आसाम, 1956) आणि राजस्थानच्या प्रदीप सुंदरम (10/78, राजस्थान विरुद्ध विदर्भ, 1985) यांनी हा रेकॉर्ड केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
फर्स्ट क्लास क्रिकेटमधील एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा अंशुल हा सहावा भारतीय आहे. यापूर्वी अनिल कुंबळे, सुभाष गुप्ते आणि देवाशीष मोहंती यांनी देखील हा पराक्रम (Indian bowlers with 10-wicket hauls in First-Class cricket) केला आहे.
हरियाणाकडून यापूर्वी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड जोगिंदर शर्माच्या नावावर होता. जोगिंदरनं 2004-05 च्या सिझनमध्ये विदर्भाच्या विरुद्ध एका इनिंगमध्ये 8 विकेट्स घेतल्या होत्या. अंशुलनं यावर्षीच (IPL 2024) मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 3 मॅचमध्ये 2 विकेट्स घेतल्या.
( नक्की वाचा : IPL 2025 Mega Auction : 17 वर्षांचा मुंबईकर होणार CSK मध्ये ऋतुराजचा जोडीदार? धोनीही झाला प्रभावित )
अंशुल हरियाणाच्या करनालमधला आहे. त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 18 मॅचमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. अंशुलनं आत्तापर्यंत त्याच्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. आता आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी त्यानं केलेल्या कामगिरीमुळे त्याला चांगला भाव मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world