जाहिरात

100 विद्यार्थांना अमानुष मारहाण! मुलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा, सरकारी शाळेत घडला संतापजनक प्रकार

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक क्रीडा उपक्रमासाठी बाहेर गेले असताना ही संपूर्ण घटना घडली. पालकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

100 विद्यार्थांना अमानुष मारहाण! मुलांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा, सरकारी शाळेत घडला संतापजनक प्रकार
Government School Crime News

मनिष रक्षमवार, प्रतिनिधी

Today Crime News : वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. मोबाईल चोरीच्या संशयावरून तब्बल 100 विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेत कार्यरत असलेला सफाई कामगार अजय चंद्रगिरीवार (खमनचेरू) यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता अजयने विद्यार्थ्यांवर हात उगारला, असा आरोप आहे. संबंधित आरोपीने विद्यार्थ्यांच्या हातावर व पायावर मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. हा भयंकर प्रकार आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय चंद्रगिरीवारला ताब्यात घेतलं आहे.

शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक बाहेरे गेले, तेव्हा जे घडलं..

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक क्रीडा उपक्रमासाठी बाहेर गेले असताना ही संपूर्ण घटना घडली.घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली आणि शाळा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाईची मागणीही पालकांनी केली आहे. “मोबाईल चोरीचा आरोप सिद्ध होण्याआधीच निष्पाप मुलांवर मारहाण करणे ही अमानुष व निंदनीय बाब आहे,”अशी प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. 

नक्की वाचा >> Explainer :  घाईगडबडीत सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय भीती होती?

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. तसच विद्यार्थ्यांचा जबाबही नोंदवला जात आहे. शासकीय निवासी शाळेत घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी सामाजिक संघटना व पालकांकडून केली जात आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एकरे यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग रखडणार? भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांसह शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत मागण्या?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com