जाहिरात

Maoists : बिजापूरमध्ये 12 नव्हे 18 माओवादी ठार; 50 लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचाही मृत्यू

या चकमकीत 12 नव्हे 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली आहे.

Maoists : बिजापूरमध्ये 12 नव्हे 18 माओवादी ठार; 50 लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्याचाही मृत्यू

दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड बिजापूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 12 माओवादी ठार झाल्याचे छत्तीसगढ पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र या चकमकीत 12 नव्हे 18 माओवादी ठार झाल्याची कबुली स्वतः माओवाद्यांनी पत्रक काढून दिली आहे. या चकमकीत 50 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता दामोदर उर्फ चोकाराव याचा मृत्यू झाल्याची माहिती माओवाद्यांनी पत्रकातून दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दामोदरवर तेलंगणामध्ये 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं. हा स्टेट कमिटी मेंबर आणि तेलंगणा स्टेट कमिटीचा प्रमुख होता. दामोदरसोबत पीपीसीएम असलेला हुंगी, देवे, जो आणि नरसिंहराव हे माओवादी ही ठार झाल्याची माहिती माओवाद्यांनी पत्रकातून दिली आहे. 

Beed Crime : बीड प्रकरणातून घेतला धडा, पिस्तूलराज रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल 

नक्की वाचा - Beed Crime : बीड प्रकरणातून घेतला धडा, पिस्तूलराज रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठं पाऊल 

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये 12 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त होतं. मात्र या चकमकीत तब्बल 18 माओवाद्यांचा मृत्यू झाला आहे. माओवाद्यांना स्वत: याबाबत पत्रक जारी केलं आहे. हल्ल्यानंतर माओवाद्यांच्या पिपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी बटालियन क्रमांक एक आणि सेंट्रल रीजनल समिती कंपनीच्या पाच महिलांसह 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले होते. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी सांगितलं की, प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) दक्षिण बस्तर डिवीजन समितीने सांगितलं की, या चकमकीत तेलंगणाच्या राज्य समितीचे सदस्य दामोदरसह 18 माओवाद्यांचा मृत्यू झाला आहेय   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: