जाहिरात

Crime News : कॅनडात आणखी एका भारतीय तरुणीची हत्या, शिक्षणासाठी गेली, नोकरी मिळाली अन् जे घडलं..

कॅनडात आणखी एका भारतीय तरुणीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या 22 वर्षीय तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे.

Crime News : कॅनडात आणखी एका भारतीय तरुणीची हत्या, शिक्षणासाठी गेली, नोकरी मिळाली अन् जे घडलं..
Gujrat Girl Killed In Canada

Crime News Today : कॅनडात आणखी एका भारतीय तरुणीची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या 22 वर्षीय तरुणीची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. विधी कल्पेशभाई मेघानी असं हत्या झालेल्या तरुणीचं नावा आहे. ती मूळची आणंद बोरसदची रहिवासी असून ती सध्या कॅनडाच्या नियाग्रा परिसरात राहायची. विधी शिक्षणासोबतच तिथे नोकरीही करायची. स्थानिक पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधी कॅनडात PR ची तयारी करत होती. विधीच्या हत्येचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान, विधीच्या हत्येच्या घटनेबाबत कळताच गुजरातमधील तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, विधी मेघानीचं अमेरिकेच्या बॉर्डरजवळ चाकूने हत्या करण्यात आली.

नक्की वाचा >> Pune News : बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, नागरिकांमध्ये भीतीचं सावट, पुण्यात कुठे सुरु होता संतापजनक प्रकार?

चार वर्षांपासून कॅनडाच्या नियाग्रा परिसरात राहायची

विधी मागील चार वर्षांपासून कॅनडाच्या नियाग्रा परिसरात राहत होती. ही घटना 15 मे रोजी घरातून बाहेर पडल्यावर ही घटना घडली. हत्येनंतर तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. डॉक्टरांनी विधीला मृत घोषित केलं. कॅनडा पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

नक्की वाचा >> Akola News: 'या' पतसंस्थेत 16 कोटी 79 लाखांचा गबन, अध्यक्ष आणि CEO अटकेत, 182 गुंतवणूकदार अडचणीत

Latest and Breaking News on NDTV

परदेशात भारतीयांवर वाढते हल्ले

कॅनडात भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्या झाल्याची ही पहिला घटना नाही. याआधी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये टोरोन्टोत 30 वर्षीय भारतीय वंशाची महिला हिमांशी खुरानाचा मृतदेह सापडला होता. तर एप्रिल 2025 मध्ये ओंटारियोत मूळची पंजाबची 21 वर्षीय तरुणी हरसिमकर संधावाला गोळी मारण्यात आली होती. कॅनडा पोलिसांनी याप्रकरणी एका 32 वर्षीय आरोपीला अटक केली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com