जाहिरात

चेन्नईतील समुद्रावर महाराष्ट्रातील 3 मुलं गेली वाहून; भंडाऱ्यातील मयुरी चौधरीचा मृत्यू, एक विद्यार्थी बेपत्ता

चेन्नई येथे कॉग्निझंट या कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

चेन्नईतील समुद्रावर महाराष्ट्रातील 3 मुलं गेली वाहून; भंडाऱ्यातील मयुरी चौधरीचा मृत्यू, एक विद्यार्थी बेपत्ता

अभय भुते, प्रतिनिधी

Accident while taking selfie on the beach : चेन्नई येथे कॉग्निझंट या कंपनीत इंटर्नशिपसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील काही विद्यार्थी इंटर्नशिपसाठी चेन्नईला गेले होते. यातील काही विद्यार्थी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी (गोल्डन बीच) समुद्रकिनारी फिरायला गेले होते. ते समुद्रकिनारी सेल्फी घेत असताना दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी उर्फ माही हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू झाला आहे.

सेल्फीचा मोह जीवावर बेतला...

तामिळनाडू सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 पैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. मुलं समुद्रात उतरून सेल्फी घेत होते. त्यावेळी समुद्रात १० ते १५ फुटांची लाट उसळली. आणि तीन मुलं समुद्रात ओढले गेले. यातील भंडारा येथील मयुरी चौधरी हिचा मृत्यू झाला तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचा शोध घेतला जातो आहे. राज केदारी सुरक्षितपणे बाहेर आला आहे. जय पाटील यांचे नातेवाईक हे चेन्नई येथे पोहोचले आहेत. मयुरी चौधरी हिचे नातेवाईक नागपूरहून चेन्नईसाठी रवाना झाले आहेत.

नक्की वाचा - ‘दादा मला माफ करा, जय महाराष्ट्र'; शिंदे गटाच्या नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्समुळे खळबळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट...

चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com