जाहिरात

Viral Video: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! सापांचा प्रणय कॅमेऱ्यात कैद, भंडाऱ्याचा Video होतोय व्हायरल

सर्पतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात अनेक सापांचा प्रजनन हंगाम सुरू असतो.

Viral Video: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! सापांचा प्रणय कॅमेऱ्यात कैद, भंडाऱ्याचा Video होतोय व्हायरल
भंडारा:

अभय भुते

निसर्गाचे काही अद्भूत चमत्कार असतात. ते कधी पाहायला भेटतात तर कधी फक्त ऐकायला भेटतात. पण फार असे प्रसंग असतात ज्यामध्ये हे चमत्कार पाहाता येतात. मग ते प्रत्यक्ष असतील किंवा मग ते व्हिडीओच्या स्वरूपात असतील. मोबाईलच्या जमान्यात आपल्याला अशा गोष्टी अनेक वेळा मोबाईलवर पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय भंडाऱ्यात आला आहे. एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात सापांची प्रणयक्रीडा कैद झाली आहे. नेटकऱ्यामध्ये हा व्हिडीओ उत्सुकतेचा विषय ठरला आहे. 

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सुकळी महागाव इथं जंगलाचा भाग आहे. याच जंगलात  दोन सापांचे मिलन होतानाचा हा व्हिडीओ आहे. हे दृष्य दुर्मिळ समजले जाते. हे दृश्य दिसताच गावकऱ्यांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. काहींनी याचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. काही वेळ दोन्ही साप एकमेकांत गुंतून शांतपणे प्रणयक्रिया करत होते. काही जण हे मिलन पहाणे शुभ असते असं मानतात. तर काहींच्या मते हा एक निसर्गाच् अद्भूत चमत्कार आहे. तो नशिबानेच पाहायला मिळतो. 

नक्की वाचा - Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास

सर्पतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात अनेक सापांचा प्रजनन हंगाम सुरू असतो. या काळात नर आणि मादी सापचे मनोमिलन होत असते. अशा वेळी त्यांना त्रास दिल्यास किंवा पकडण्याचा प्रयत्न केल्यास ते बचावासाठी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे अशा घटना दिसल्यास नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे, गर्दी करू नये आणि सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात शांतपणे राहू द्यावे, असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात आले आहे.

नक्की वाचा - Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी असा प्रकार पहिल्यांदाच पाहीला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर ही केला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील मोठा भाग हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे इथं जंगली प्राणी आहेत. मात्र अशा पद्धतीचे दुर्मिळ प्रसंग कधी तरी सर्वा समोर येतात. मात्र असं असलं तरी सर्प मित्रांनी सर्वांना सावधतेचा इशारा दिला आहे. या वेळी सापांना डिवचू नये किंवा त्यांच्या वाट्याला जावू नये असे आवाहन केले आहे. शिवाय सापांना पाहून घाबरून जावू नये असे आवाहन ही केले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com