जाहिरात

Girl Driving Car : 17 वर्षांच्या मुलीला कार शिकवताना भयंकर घडलं; बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू

मोटर ट्रेनिंग स्कूलमधून शिकविण्याऐवजी स्वत:च्या गाडीतून कार शिकवणं एका कुटुंबाला महागात पडलं आहे.

Girl Driving Car : 17 वर्षांच्या मुलीला कार शिकवताना भयंकर घडलं; बापासह तीन बहिणींचा जागीच मृत्यू

Road Accident : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोटर ट्रेनिंग स्कूलमधून शिकविण्याऐवजी स्वत:च्या गाडीतून कार शिकवणं एका कुटुंबाला महागात पडलं आहे. वडील मुलीला वणी - घुग्गुस मार्गावर कार शिकवित होते. त्यादरम्यान झालेल्या अपघातात वडिलांसह तिन्ही बहिणींचा मृत्यू झाला आहे. 

या अपघातात वडील रियाजुद्दीन रफिउद्दीन शेख (५२), तीन मुली मायरा रियाजुद्दीन शेख (१७), जोया रियाजोद्दीन शेख (१२), अनिबा रियाजोद्दीन शेख (१०) यांचा मृत्यू झाला आहे. तर रियाज यांच्या भावाची पाच वर्षांची मुलगी इनाथा शारीख शेख गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

नक्की वाचा - Kalyan Crime: मामाने अडवलं, भाच्याला खटकलं.. पायऱ्यांवर आपटून आपटून संपवलं, कल्याणमध्ये खळबळ!

नेमका कसा झाला अपघात? 

मिळालेल्या माहितीनुसार, रियाजुद्दीन शेख त्यांची मुलगी  मायराला कार शिकवित होते. मागच्या सीटवर त्यांच्या दोन मुली आणि भावाची मुलगी बसली होती. घुग्गुस मार्गाने वणीकडे येताना मायराल कार चालवित होती. यावेळी जन्नत हॉलजवळ मायराचे कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला आदळली.कारचा स्पीड जास्त असल्याने दुभाजकाला आदळल्यानंतर कार उसळली आणि विरुद्ध लेनवर आदळली. यादरम्यान त्या लेनवरुन जाणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ट्रकचा स्पीड जास्त होता. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चुराडा झाला. नागरिकांनी जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रियाजुद्दीन यांच्यासह त्यांच्या तिन्ही मुलींचा या अपघातात मृत्यू झाला. 

मोटर ट्रेंनिगमधून प्रशिक्षण गरजेचं...

कार किंवा दुचाकीचं मोटर ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. त्याशिवाय मायराच्या कारच्या स्पीड जास्त होती. त्यामुळे तिला गाडीवर नियंत्रण करता आलं नाही. परिणामी भीषण अपघात घडला. अशावेळी पूर्वतयारीसाठी मोटर ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेणं केव्हाही फायद्याचं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com