 
                                            अमजद खान, प्रतिनिधी:
Kalyan Crime: मुंबईच्या पवईमधील रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरण चर्चेत असतानाच कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कल्याणमध्ये भाच्यानेच मामाची निर्घृुण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. भाचीच्या प्रसुतीनंतर एकत्र आलेल्या मामा- भाच्यामध्ये झालेल्या किरकोळ वादातून ही भयंकर घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाचीची प्रसूती झाली. बहिणीचा भाऊ तिला पाहण्यासाठी आला. मामाने मज्जाव केला. यावरुन झालेला वाद विकोपाला गेला. रुग्णालयाच्या जिन्यावर डोके आपटून भाच्याने मामाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणच्या माेहने परिसरात घडली आहे. या प्रकरणात कल्याण खडकपाडा पोलिसांनी मामाची हत्या करणारा आरोपी नागेश पुजारी याला अटक केली आहे.
Gujrat Court News: IVF व्दारे बाळाला जन्म द्यायचाय, जन्मठेपेतील पती-पत्नीची पॅरोलवर सुटका!
नेमकं काय घडलं?
मामा मरियप्पा नायर आणि नागेश मुंबईत एकत्र राहत होते. मोहने परिसरात राहणाऱ्या एका महिलेची प्रसूती झाली. मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणारा महिलेचा मामा मरियप्पा नायर आणि महिलेचा भाऊ नागेश पुजारी मोहन्याला आले. महिलेची प्रसूती झाल्यावर महिलेचा भाऊ नागेश पूजारी तिला पाहण्यासाठी वा'र्डरुममध्ये जात असताना त्याचा मामा मरियप्पा याने त्याला थांबविले.
फरशीवर डोकं आपटून हत्या..
आत्ता नको जाऊ. नंतर जा. असे सांगितल्यानंतर नागेश आणि मरियप्पा यांच्यात जोरदार वाद झाला.  या वादानंतर नागेश याने त्याचा मामा मरियप्पा याला मारहाण सुरु केली. मारहाणी दरम्यान नागेश याने मरियप्पा यांचे डोके रुग्णालयाच्या जिन्यावर आपटले. मरियप्पा यांना गंभीर दुखापत झाली. उपचारा दरम्यान मरियप्पा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच मरियप्पा यांची हत्या करणारा त्यांचा भाचा नागेश याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास खडकपाडा पोलिस  ठाण्याचे पोलिस करीत आहे. या घटनेमुळे मोहने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
Satara Doctor Suicide Case: कारवाई केली नाही तर... सातारा महिला डॉक्टर प्रकरणी महिला नेत्याचा मोठा इशारा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
