
पुण्यात वैष्णवी हगवणेंचं प्रकरण ताजं असताना सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैष्णवी हगवणेंप्रमाणेच सोलापुरात आशाराणी भोसले हिला सासरच्यांकडून छळ करण्यात आला, यातच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने आत्महत्या केली तेव्हा ती तीन महिन्यांची गर्भवती होती. आशाराणीची हत्या करण्यात आली असा आरोप तिच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोहोळ तालुक्यात सासरच्या मंडळीच्या छळाला कंटाळून या विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं. चिंचोली एमआयडीसी येथे राहणाऱ्या विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आशा राणी भोसले असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचं नाव आहे. चिंचोली एमआयडीसी येथे आशाराणी भोसले हिचा गळफास बनाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
नक्की वाचा - Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
आशाराणी भोसले हिने गळफास घेतल्यानंतर तिला मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आशाराणी भोसले हिला तीन वर्षाची मुलगी आहे. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचं नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे. आाशाराणी भोसले हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्यामुळे चार ते पाच वेळा माहेरच्या मंडळींनी त्यांच्यातील घरगुती वाद मिटवला होता. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world