Pune News: शेजाऱ्याने चिमुकलीला रुममध्ये बोलावलं..नराधमाचं कृत्य पाहून पीडितेची आई अन् आत्या हादरली

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Pune Pimpari Chinchwad Crime News
पुणे:

सूरज कसबे, प्रतिनिधी 

Pune Crime News Today : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विनायकनगर येथील शिवशंभो कॉलनीमध्ये एका 40 वर्षीय नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी एम.आय.डी.सी.भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.रामु कुंजल निसाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,2 एप्रिल रोजी सायंकाळी आरोपीने पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केला.या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारू,अशी धमकी त्याने दिली होती. दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा धक्कादायक प्रकार पाहिला. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: विद्यार्थ्यांनो अलर्ट राहा, कल्याणमध्ये JEE परीक्षा केंद्रावर एका तरुणीला प्रवेश नाकारला, कारण..

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट 

त्यांनी तात्काळ एम.आय.डी.सी.भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64 (1),65 (2),74,351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाच्या कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.