Crime News : अभिनेत्री निघाली सेक्स रॅकेटची दलाल; मुंबई पोलिसांच्या कारवाईत मोठा पर्दाफाश

Crime News : मुंबईजवळच्या काशिमीरा परिसरात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट एका 41 वर्षीय अभिनेत्रीकडून चालवले जात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Crime News : अभिनेत्री ग्राहकांना भेटायला आली आणि पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Crime News : मुंबईजवळच्या काशिमीरा परिसरात पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे रॅकेट एका 41 वर्षीय अभिनेत्रीकडून चालवले जात होते. पोलिसांनी अभिनेत्रीच्या तावडीतून 2 महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे.

हे सेक्स रॅकेट प्रामुख्याने उच्चभ्रू समाजातील ग्राहकांसाठी चालवले जात होते. अनुष्का मोनी मोहन दास असं या आरोपी अभिनेत्रीचं नाव आहे. ती या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, सुटका करण्यात आलेल्या 2 महिला कलाकारांनी टीव्ही मालिका आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. पोलिसांनी त्यांची सुटका करून त्यांना आश्रयगृहात पाठवले आहे.

( नक्की वाचा : Pune News : गणेश विसर्जन पूर्वसंध्येला पुणे हादरलं; नाना पेठेत गँगवॉर, कुख्यात आरोपीच्या मुलाचा खून )
 

कसा रचला सापळा?

गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या सेक्स रॅकेटचा मागोवा घेत होते. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 बनावट ग्राहक तयार केले आणि त्यांच्यामार्फत आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी या ग्राहकांना काशिमीरा येथील एका मॉलमध्ये बोलावले. पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे, अभिनेत्री ग्राहकांना भेटायला आली आणि पैसे स्वीकारत असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडले.

आरोपी अभिनेत्रीला अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या रॅकेटमधील इतर व्यक्ती, दलाल आणि संपूर्ण नेटवर्कचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यात वंचितच्या नेत्याच्या मुलावर 7 वार; संतप्त समर्थकांकडून आरोपीचे वाहन जाळून हल्ला )
 

सिनेसृष्टीतील काळं जग उजेडात

या घटनेमुळे रुपेरी पडद्यामागे चालणारे गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आले आहेत. वेश्या व्यवसायासारख्या गंभीर गुन्ह्यात एका अभिनेत्रीचा सहभाग उघड झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी आपला तपास वाढवला असून, लवकरच या रॅकेटमधील इतर धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता आहे.


 

Topics mentioned in this article