मुलांसाठी केलेलं व्रत त्यांच्यावरच उलटलं; बिहारमधील जितीय सणादिवशी 37 मुलांसह 46 जणांचा मृत्यू  

बिहारमध्ये (Bihar News) जितीय सणादरम्यान नदी आणि तलावात पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या 37 लहान मुलांसह 46 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पाटना:

बिहारमध्ये (Bihar News) जितीय सणादरम्यान (Jitiya festival) नदी आणि तलावात पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या 37 लहान मुलांसह 46 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये हा भीषण प्रकार घडला. बिहारमध्ये बुधवारी  जितीय सण साजरा करण्यात आला होता. यावेळी 46 जणांना तलाव आणि नदीमध्ये अंघोळ करताना बुडल्यामुळे मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कैमूर, बक्सर, सीवान, रोहतास, सारण, पाटना, वैशाली, मुजफ्फरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवल या भागातील नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

नक्की वाचा - Pune : इस्त्री करताना वीज गेली, मुलाला शाळेत सोडायची घाई; घरी परतली अन् महिलेच्या संसाराची 'राखरांगोळी' 

औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, जिल्हा प्रशासनाकडून जितीया सणादरम्यान नदीजवळी परिसरात स्नान करणाऱ्यांसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र स्नानिक पातळीवर जिल्हा प्रश्नासनाकडून फारशी व्यवस्था करण्यात आली नव्हती. मात्र स्थानिक ठिकाणी लोक नदीकिनारी जात असल्याने समस्या निर्माण झाली. 

नक्की वाचा - महिलेचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या मुख्य आरोपीचाही धक्कादायक शेवट, दुचाकीशेजारी आढळला...

बिहारमध्ये जितीया उपवास आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी केला जातो. हा सण छठप्रमाणे असतो. याअंतर्गत 24 सप्टेंबरपासून याची सुरुवात होते. 25 सप्टेंबरला उपवास आणि 26 सप्टेंबरला पारण करण्यासह व्रताचं समापन होतं. या घटनेनंतर संपूर्ण बिहारमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.