Nagpur Crime: नागपूर हादरलं! शांतिनगरमध्ये 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, पीडितेच्या पालकांना समजलं अन्..

नागपूरच्या शांतीनगरमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका नराधमाने परिसरातील 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
Nagpur 8 Minor Girls Abused Case

Nagpur Crime News Today : नागपूरच्या शांतीनगरमध्ये सर्वात भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका नराधमाने परिसरातील 8 अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण नागपूर शहर हादरलं आहे.आरोपीने वेळीवेळी संधी साधून या मुलींना त्याच्या जाळ्यात ओढून घेतलं आणि त्यांच्याशी अश्लील चाळे केले. तसच आरोपीने पीडित मुलींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंगही केल्याचं समोर आलं आहे.निहाल कैथल (27)असं या आरोपीचं नाव आहे. 

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी झाला फरार

शांतिनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS)संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Crime News: इन्स्टाग्रामवरून मोठं कांड! अश्लील फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी, पुढे घडलं असं काही..

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलींच्या पालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला असून,पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.