जाहिरात

Crime News: इन्स्टाग्रामवरून मोठं कांड! अश्लील फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी, पुढे घडलं असं काही..

इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.ही घटना राजापूर तालुक्यात घडली.

Crime News: इन्स्टाग्रामवरून मोठं कांड! अश्लील फोटो व्हायरल करण्याची डॉक्टरला धमकी, पुढे घडलं असं काही..
Instagram Crime Story Latest

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Today Crime News : इन्स्टाग्रामवर मैत्री करून एका डॉक्टरला नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 25 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहेत.ही घटना राजापूर तालुक्यात घडली.याप्रकरणी एका संशयिताविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिद्धेश जयवंत आंबरे असं आरोपीचं नाव आहे.या प्रकरणाचा राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत. 

संशयिताला 25 हजार रुपये पाठवले

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित महिलेच्या सांगण्यावरून तक्रारदाराचे स्वत:चे नग्न फोटो शेअर केले होते. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.त्यानंतर आरोपीने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. संशयिताकडे असलेले फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची धमकी दिली.

नक्की वाचा >>मुंबईत पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण, MHADA ने जाहीर केल्या 82 अतिधोकादायक इमारती, पाहा संपूर्ण यादी

'पैसे दिले नाहीत तर फोटो इतरत्र शेअर करू' अशी धमकीही आरोपीने दिली होती.या भीतीपोटी तक्रारदाराने गुगल पेद्वारे संशयिताला 25 हजार रुपये पाठवले.मात्र,त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.याप्रकरणी राजापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Pune News: पुण्याच्या राजगडमध्ये दबक्या पावलांनी 'तो'आला, पानशेत खोऱ्यात व्हिडीओ काढताना लोकांचा थरकाप उडाला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com