जाहिरात

प्रेमासाठी पंजाबवरून रत्नागिरीत आली, सत्य समोर येताच हादरून गेली, नक्की काय घडलं?

नवं राज्य नव्या संसाराची स्वप्न ती पाहात होती. आपण केलेलं प्रेम हे लग्नाच्या बंधनात अडकणार याचं समाधान तिला होतं. तेच स्वप्न घेवून ती चंदीगडवरून रत्नागिरीला निघाली.

प्रेमासाठी पंजाबवरून रत्नागिरीत आली, सत्य समोर येताच हादरून गेली, नक्की काय घडलं?
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

रत्नागिरीत अशी घटना घडली आहे ज्यामुले सर्वच जण आवाक झाले आहे. प्रेमासाठी पंजाबची तरूणी थेट पंजाब सोडून रत्नागिरीत आली. लग्न करण्याचे तिच्या डोक्यात होते. नवं राज्य नव्या संसाराची स्वप्न ती पाहात होती. आपण केलेलं प्रेम हे लग्नाच्या बंधनात अडकणार याचं समाधान तिला होतं. तेच स्वप्न घेवून ती चंदीगडवरून रत्नागिरीला निघाली. कधी रत्नागिरीली पोहोचते आणि आपल्या प्रियकराला भेटते असं तिला झालं होतं. त्याच्यासाठी ती हजारो किलो मिटरचा प्रवास करून रत्नागिरीत पोहोचली. पण ज्यावेळी ती रत्नागिरीत पोहोचली आणि तीला त्या प्रेमा मागचं सत्य समजलं तेव्हा ती पुर्ण हादरून गेली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याची सुरुवात होते ती जुलै 2023 मध्ये. पंजाबची ही तरूणी मोहालीमध्ये राहात होती. 12 वीचं शिक्षण ती घेत होती. तिच्याकडे मोबाईल होता. त्या मोबाईलमध्ये ती इंन्टाग्राम वापरत होती. त्यावर एक दिवस एक फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि तिचं जिवनचं पालटलं. ती त्याच्याशी बोलू लागली. तासनतास गप्पा मारू लागली. घट्ट मैत्री झाली. पुढे प्रेमही झालं. तो रत्नागिरीत आणि ती पंजाबमध्ये. दोघांमध्ये संभाषण होत होत ते फक्त मोबाईलवरून.शेवटी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्याने तिच्यावर रत्नागिरीत येणास दबाव टाकला. ती तयार नव्हती. पण प्रेमासाठी तीही तयार झाली. शेवटी तीने घर सोडलं. चंदिगडवरून रत्नागिरीसाठी निघाली. 

ट्रेंडिंग बातमी - 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले

सोशल मीडियावर ओळख झाली होती. त्यानंतर लग्न करण्याचंही त्या दोघांचं ठरलं होतं. पंजाबमधल्या मोहाली येथून निघालेली तरूणी डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न घेवून रत्नागिरीत अखेर पोहोचली. पण रत्नागिरीत आल्यावर प्रियकर नॉट रीचेबल होता. तिने त्याला मेसेजही केले पण काही रिप्लाय येत नव्हता. प्रियकराचा जो नंबर होता, तो नंबर दुसराच कोणाचा असल्याचं समोर आलं. तिने त्याला फोन करण्याच प्रयत्न केला. पण फोन काही लागत नव्हता. जो फोन लागला तो कोणी मुलीने उचलला होता.  अखेर आपली  फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. 

ट्रेंडिंग बातमी -  सुप्रिया सुळेंचा फोन - वॉट्सअप हॅक, केलं मोठं आवाहन

आता काय करावे हे तिला समजेना. परराज्यात तेही पळून आल्यानंतर आपली कोण मदत करणार असा प्रश्न तीला पडला होता. इथेच कोणती तरी नोकरी करून पैसे कमवू आणि पंजाबला परत जावू असं तिने ठरवलं. पुढे मोबाईल दुकानात ती गेली. तरूणीनं नोकरीचा शोध सुरू केला. मोबाईलच्या दुकानात तिने नोकरीची चौकशी केल्यावर मोबाईल दुकानदारानं या तरूणीची सारी चौकशी केली. त्यानंतर सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर तरूणीला पोलिसात घेवन गेला.  या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तरूणीच्या घरच्यांशी संपर्क केला. दरम्यान, तरूणी तिच्या पंजाबमधील गावी परतली आहे. तर, तरूणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याबाबतचा शोध देखील सुरू केला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com