राकेश गुडेकर
देशातील बहुतांश हिंदू हा संपला आहे. पुढे ही संपणार आहे. हे वेळीच टाळलं पाहीजे असं मत नरेंद्र महाराज यांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी त्यांनी एक अजब सल्ला ही दिला आहे. हिंदूंनी हम दो हमारा एक हे धोरण सोडलं पाहीजे. ते म्हणतात की मी आवाहन करेन की तुम्ही दोन आणि तुमची किमान दोन ही भूमीका घेतली पाहीजे. असं केलं तरच हिंदू या देशात राहील असं ही ते म्हणाले. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे ती वाढवण्याची जबाबदारी ही आपलीच असल्याचं एक प्रकारे त्यांनी सांगितलं आहे.
जगात मुस्लीम राष्ट्र आहेत. ख्रिश्चन राष्ट्र आहेत. तसं एक तरी हिंदू राष्ट्र असलं पाहीजे असं नरेंद्र महाराज म्हणाले. इजरायल आणि मुस्लीम राष्ट्र यांच्यात युद्ध सुरू आहे. ते त्यांच्या भूमीचं रक्षण करण्यासाठी सर्व मुस्लीम राष्ट्र एकवटली आहेत. हे आपण पाहात आहोत. त्यामुळे मी सर्व हिंदून एकत्र राहण गरजेचं आहे. बहुतांश हिंदू सध्या संपला आहे. संपत आहे. हे टाळण्यासाठी हम दो हमारा एक ही भूमीका सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी होत आहे. मुस्लीमांची संख्या वाढत आहे असं ही ते म्हणाले. त्यात ही वोट बँकेचे राजकारण आहे असं सांगायला ही ते विसरले नाहीत.
सर्व हिंदूंनी देव, देश आणि धर्मावर प्रेम केलं पाहीजे. अशा लोकांना आमच्या सारख्या धर्मगुरूंनी समर्थन दिलं पाहीजे असं ही नरेंद्र महाराज म्हणाले. हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहीजे. त्यांनी संघटीत झालं पाहीजे असं ही ते म्हणाले. त्यामुळे आत एका वर थांबू नका. किमान दोन मुलं झाली पाहिजेत असं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. हिंदूंची लोकसंख्या नियंत्रणात आणि इतरांची मात्र झपाट्याने वाढत आहे त्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. नरेंद्र महाराज चिपळूणमध्ये बोलत होते.
पुढे ते म्हणाले की आपली संस्कृती आपल्याला कळली नाही. म्हणून आपण पुरोगामी नावाखाली धिंगाणा घालतो. अध्यात्मातलं विज्ञान आपल्याला कळलेलं नाही, म्हणून आपला धिंगाणा सुरु आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी मनःशांती देऊ शकत नाही. ते फक्त अध्यात्मच देऊ शकते असं ही नरेंद्र महाराज म्हणाले. अध्यात्मात वैद्यनिक दृष्ठिकोन आणि सामाजिक दृष्ठिकोन आहे. हे पुरोगाम्याना कधी तरी कळेल. पुरोगामीत्वाच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती स्विकारण्याचं काम सुरू आहे. ती खरी दुर्बुद्धी आहे असं ही ते म्हणाले. जगात भारत हा एकमेव सक्षम देश आहे, जो संस्कृतीच्या माध्यमातून मनःशांती देऊन शकतो असं त्यांनी दावा केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world