भयंकर! वर्षभरापासून अल्पवयीन मुलावर 7 जणांचा अत्याचार,3 आरोपी अल्पवयीन

7 मुले पीडित अल्पवयीन मुलावर हे अत्याचार करत होते. गेल्या वर्षभरापासून हा किळसवाणा प्रकार सुरू होता.

Advertisement
Read Time: 2 mins
धुळे:

धुळे शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील मोगलाई भागातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत. शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 मुले पीडित अल्पवयीन मुलावर हे अत्याचार करत होते. गेल्या वर्षभरापासून हा किळसवाणा प्रकार सुरू होता. सर्वात धक्कादायक म्हणजे या सात आरोपीं पैकी 3 आरोपी हे अल्पवयीन आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

धुळे शहरातील मोगलाई भागात मिशन कंपाउंड हा परिसर आहे. या ठिकाणी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगा राहतो. याच ठिकाणी  एक वर्षापासून याच भागातील काही तरूण त्याचे  लैंगिक शोषण करत होते. एक वर्ष सुरू असलेला हा प्रकार त्याने कधीच कोणाला सांगितला नाही. त्यावर होणारा अत्याचार तो सहन करत होता. त्यातरूणाला याबाबत कुठेही बोलू नकोस अशी धमकी देण्यात आली होती. त्यातून त्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता.   

ट्रेंडिंग बातमी - निवृत्त बँक मॅनेजरला गंडवलं, तब्बल साडेनऊ लाखांचा लावला चुना

मात्र त्याला त्रास असह्य होत गेला. त्याने शेवटी ही बाब आपल्या कुटुंबाला सांगितली. त्यानंतर त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. तातडीने मुलाला घेवून कुटुंबाने पोलिस स्थानक गाठले. धुळे शहर पोलीसां समोर झालेली सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई केली. शिवाय बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली

या प्रकरणी धुळे पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन होते. त्यांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. तर उर्वरीत चार जणांना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. या घटनेने धुळे शहर हादरून गेले आहे. मुलीं प्रमाणे आत मुलं ही सुरक्षित नसल्याचे या प्रकरणानंतर बोलले जात आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article