जाहिरात

Crime News : मुलीच्या वसतिगृहात सुरू होते काळे धंदे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुली येथे ठेवल्या जात होत्या. येथूनच त्यांना बाहेर पाठवलं जात होतं, अशी माहिती आहे.

Crime News :  मुलीच्या वसतिगृहात सुरू होते काळे धंदे, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
सेक्स रॅकेटचा खुलासा झाल्यानंतर हॉस्टेल व्यवस्थापनावर सवाल उपस्थित केला जात आहे.
रांची:

Crime News : रांचीमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू होतं. या प्रकरणात दहा तरुणींसह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. या हॉस्टेलच्या माध्यमातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्टेल परिसरात संघटितपणे देह व्यापार सुरू होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि तपास सुरू केला. येथून तरुणींना वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात येत होतं. 

सूचनेच्या आधारावर तत्काळ टीमचं गठण करण्यात आलं  आणि छापेमारी करण्यात आली. घटनास्थळावरुन पकडण्यात आलेल्या तरुण-तरुणींची चौकशी केली जात आहे. बऱ्याच काळापासून या हॉस्टेलचा वापर सेक्स रॅकेटसाठी केला जात होता. मुली येथे ठेवल्या जात होत्या. येथूनच त्यांना बाहेर पाठवलं जात होतं. यासाठी मोठी रक्कम वसुल केली जात होती. छापेमारी अभियानात शहराच्या डीएसपीसह अनेक पोलीस अधिकारी सामील होते. 

Crime News : अभिनेत्री निघाली सेक्स रॅकेटची दलाल; मुंबई पोलिसांच्या कारवाईत मोठा पर्दाफाश

नक्की वाचा - Crime News : अभिनेत्री निघाली सेक्स रॅकेटची दलाल; मुंबई पोलिसांच्या कारवाईत मोठा पर्दाफाश

बाहेरील लोकांचाही सहभाग

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही बाब गंभीर आहे आणि यात हॉस्टेल व्यवस्थापनाची भूमिका देखील तपासली जात आहे. या रॅकेटमध्ये अनेक बाहेरील लोकांचाही सहभाग असू शकतो असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासाची व्याप्ती वाढवली जात आहे आणि संभाव्य सूत्रधार आणि साथीदारांची ओळख पटवली जात आहे. यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी पोलिसांनी झारखंडमधील हजारीबागमध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. येथील महामार्गालगतच्या सहा हॉटेल्सवर छापा टाकून २६ तरुण-तरुणींना संशयास्पद स्थितीत ताब्यात घेण्यात आले होते. नंतर, यापैकी १७ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. यामध्ये हॉटेल्सचे संचालक आणि व्यवस्थापक यांचा समावेश होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com