सायबर क्राईमच्या घटना वाढल्या आहे. त्या माध्यमातून अनेकांना लाखो कोट्यवधींचा गंडा घातला जात आहे. अनेकांना आपल्याला गंडा घातला गेला आहे याची कल्पनाही नसते. त्यांची बँक अकाऊंट काही क्षणात रिकामी होतात. ज्या वेळी ते आपल्या अकाऊंट मध्ये किती पैसे आहेत हे चेक करतात त्यावेळी अनेकांना धक्का बसतो. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. बॉलिवूडमधील एका नामांकीत अभिनेत्रीला असाच गंडा घालण्यात आला आहे. तिच्या अकाऊंटमधून तब्बल 2 लाख 43 हजार रूपये अलगद उडवण्या आले आहेत. विशेष म्हणजे याची तिला तिळमात्र ही कल्पना नव्हती.
चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि उत्पादक कीर्ति कुल्हारी ही सायबर गुन्हेगारीची बळी ठरली आहे. अज्ञातांनी तिच्या मोबाईल आणि क्रेडिट कार्डचा बेकायदेशीर ताबा मिळवला होता. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत 2,43,852 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना ज्या वेळी समोर आली त्यावेळी कीर्ति कुल्हारीला मोठा धक्का बसला. तिने तातडीने पोलिसात धाव घेतली. शिवाय या मागे कोण आहे हे शोधून काढण्याची पोलिसांना विनंती केली.
एफआयआरनुसार, कीर्ति कुल्हारी वर्सोवा परिसरात राहते. ही घटना रात्री 9:31 वाजता घडली आहे. जेव्हा ती अंधेरी पश्चिमेतील सिनेपोलिस थिएटरमध्ये होती. तिच्या मोबाईलवर एरोमेक्सिको एअरलाईनवर 2,525 अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा संदेश आला. तिने तात्काळ बँकेशी संपर्क साधला असता, तिच्या कार्डवरून चार अनधिकृत व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. बँकेने सुरक्षेचा उपाय म्हणून कार्ड ब्लॉक केले आहे.
कीर्ति कुल्हारीने सांगितले की तिचा पासवर्ड पूर्णपणे गोपनीय होता. डिजिटल मालवेअर किंवा स्पायेअरच्या साहाय्याने फोन हॅक केल्याचा तिला संशय आहे. अंबोली पोलीस आणि सायबर सेल डिजिटल ठसे व बँक रेफरन्स नंबरच्या आधारे तपास करत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ही अशा सायबर फ्रॉडपासून सावध राहण्यासाठी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world