जाहिरात

Wardha Crime: इन्स्टाग्रामचं एक नोटिफिकेशन महागात पडलं; 'एक क्लिक' अन् 12 लाखांचा गायब

Wardha Crime: इंस्टाग्रामवर आलेली नोटिफिकेशन व्हॉट्सॲपवर डाउनलोड केल्यानंतर शेअर बाजार आणि IPO मधील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी कॉम्प्युटर ऑपरेटरची 12 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

Wardha Crime: इन्स्टाग्रामचं एक नोटिफिकेशन महागात पडलं; 'एक क्लिक' अन् 12 लाखांचा गायब

निलेश बंगाळे, वर्धा

Wardha Cyber Fraud: सोशल मीडिया आणि सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिकाधिक धोकादायक होत चालले आहे. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील एका कॉम्प्युटर ऑपरेटर तरुणाला शेअर बाजार आणि आयपीओमध्ये गुंतवणुकीवर अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 12 लाख 33 हजार 327 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून वर्धा सायबर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय घडले? कशी झाली फसवणूक?

सिंदी रेल्वे येथे राहणाऱ्या एका कॉम्प्युटर ऑपरेटर तरुणाला काही दिवसांपूर्वी त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक नोटिफिकेशन आले होते.  नोटिफिकेशनमधील सूचनेनुसार तरुणाने ते व्हॉट्सॲपवर डाऊनलोड केले. त्यानंतर त्याला एका अज्ञात व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

शेअर अन् IPO ची माहिती 

या ग्रुपवर सायबर भामट्यांनी शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि नामांकित कंपन्यांच्या आयपीओ (IPO) बाबतची आकर्षक माहिती देण्यास सुरुवात केली. कमी दिवसांत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तरुणाला एका बनावट ॲप किंवा लिंकद्वारे पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.

खात्यातून 12.33 लाख परस्पर लुटले

सायबर गुन्हेगारांच्या सांगण्यावरून तरुणाने टप्प्याटप्प्याने पैसे भरण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ॲपवर मोठा नफा दिसत असल्याने तरुणाचा विश्वास बसला. मात्र, जेव्हा त्याने गुंतवलेले पैसे परत काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे निघत नसल्याचे समोर आले. भामट्यांनी तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल 12,33,327 रुपये परस्पर हडप केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने वर्धा सायबर पोलिसांत धाव घेतली. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com