
सुनील दवंगे, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हातील संगमनेर येथे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील डॉ. अमोल कर्पे याने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला टेरीस वर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल रामनवमीच्या पहाटे घडली आहे. याप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. कर्पे वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 4 एप्रिल रोजी संगमनेर येथील कॉलेजला येत असताना एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला श्वास घेण्यास त्रास होत आहे म्हणून तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले. त्या मैत्रिणीने त्यांच्या वर्ग शिक्षक यांना फोन केला असता वर्ग शिक्षक यांनी डॉ. अमोल कर्पे यांच्या हॉस्पिटलला जाण्यास सांगितले. त्यांनतर तिला ॲडमिट करण्यात आले. रविवारी 6 एप्रिल रोजी पहाटे 4 ते 5 या वेळेत डॉ. अमोल कर्पे याला ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना देखील डॉ. कर्पे याने तिला गच्चीवर नेवून तिच्यावर अत्याचार केला.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
दरम्यान, याप्रकरणी अत्याचारित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. अमोल कर्पे याच्या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच फरार झालेला डॉक्टर अमोल कर्पे याला पोलीसांनी ना़शिक येथून ताब्यात घेतले आहे.
(नक्की वाचा - Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world