जाहिरात

Pune News : पुण्यातील काळ्या रंगाच्या दुचाकी टार्गेटवर, 100 किमी अंतरावर सुरू होती हेराफेरी, नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यात गेल्या कित्येक दिवसांपासून दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. अखेर या चोरीचं गूढ उकललं आहे.

Pune News : पुण्यातील काळ्या रंगाच्या दुचाकी टार्गेटवर, 100 किमी अंतरावर सुरू होती हेराफेरी, नेमकं काय घडलं?

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुणे जिल्ह्यात गेल्या कित्येक दिवसांपासून दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. विशेषत: काळ्या रंगाच्या दुचाकी चोरीला जात असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर या चोरीचं गूढ उकललं असून याचं कनेक्शन अहिल्यानगरमध्ये असल्याचं उघड झालं आहे. 

कधी हौस तर कधी गरज माणसाला गुन्हेगारीकडे वळवते, पण एका सुशिक्षित तरुणाने केवळ विशिष्ट रंगाच्या दुचाकीच्या आवडीपोटी चोरीचा अजब धंदा मांडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी चोरणाऱ्या अश्फाक पठाण या बीए पदवीधर चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तब्बल २१ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या ४० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील काळ्या रंगाच्या दुचाकींवर लक्ष...

पुण्यातून काळ्या रंगाच्या दुचाकी चोरीला जात होत्या. हा दुचाकी चोर अहिल्यानगरमधील असल्याचं समोर आलं आहे. बीएपर्यंत शिक्षण झालेला चोर अश्फाक पठाण याला काळया रंगाची स्प्लेंडर बाईक आवडत होती. त्यामुळे तो लक्ष्य ठेवून काळ्या रंगाची दुचाकी चोरायचा. आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. स्प्लेंडर दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोपी आहे, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि या दुचाकींना हेरायचा. यानंतर चोरी केलेली दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा. गावी कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा.

अशी होती चोरीची पद्धत

अटक करण्यात आलेला आरोपी अश्फाक पठाण हा अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील पाथर्डी गावचा रहिवासी आहे. त्याचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. चोरी करण्यासाठी तो पाथर्डीतून एसटी बसने प्रवास करून पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात येत असे. अश्फाकला काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडायच्या. ही गाडी चोरणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असल्याने तो याच गाड्यांना लक्ष्य करायचा. शहरात फिरून गाडी चोरल्यानंतर, तो त्याच गाडीवर बसून थेट पाथर्डी गाठायचा. चोरलेल्या गाड्या तो ग्रामीण भागात अतिशय कमी किमतीत विकून पैसे कमवायचा.

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, दुकानांबाहेर मोठी झुंबड; वस्तुंसाठी तब्बल 8 दिवसांचं वेटिंग

पोलिसांची मोठी कारवाई

शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक सतर्क झाले होते. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अश्फाकला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने ४० गाड्या चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. आरोपी सुशिक्षित असूनही चोरीच्या मार्गाला लागला होता. त्याने प्रामुख्याने एकाच बनावटीच्या गाड्या चोरण्यावर भर दिला होता. आमच्या पथकाने शिताफीने त्याला अटक करून मोठी रिकव्हरी केली आहे.

मोठ्या शिताफीने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अश्फाकला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com