Mumbai Woman Attacks Lover Private Parts : मुंबईमध्ये नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह असताना सांताक्रूझ परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय विवाहित महिलेने तिच्या 44 वर्षीय प्रियकराला नवीन वर्षाचे गोड पदार्थ खाऊ घालण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्याच्या गुप्तांगावर चाकूने वार केले.
या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून सध्या मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालीय. या प्रकरणातील आरोपी महिला सध्या फरार आहे.
काय होते कारण?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती आणि आरोपी महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत. ही महिला पीडित व्यक्तीच्या बहिणीची नणंद असल्याचे समजते. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून ही महिला संबंधित व्यक्तीवर स्वतःच्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत होती.
या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. या त्रासाला कंटाळून सांताक्रूझ पूर्व भागात गेल्या 18 वर्षांपासून राहणारे पीडित गृहस्थ नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारला निघून गेले होते. मात्र तिथे गेल्यावरही ही महिला त्यांना फोनवरून सतत धमकावत होती.
( नक्की वाचा : Akola News : जगायचं होतं सोबत, पण नशिबाने....अकोल्यातील शिक्षिका आणि ड्रायव्हरच्या प्रेमाचा असा झाला शेवट )
साखरेचा गोडावा अन् रक्तरंजित शेवट
बिहारहून 19 डिसेंबर रोजी मुंबईत परतल्यानंतर पीडित व्यक्तीने त्या महिलेशी सर्व संबंध तोडले होते आणि तिच्याशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास महिलेने त्यांना नवीन वर्षाचे पदार्थ देण्यासाठी घरी बोलावले. यावेळी महिलेची मुले घरात झोपलेली होती.
पीडित व्यक्ती घरात आल्यानंतर महिलेने त्यांना कपडे काढण्यास सांगितले आणि त्यानंतर किचनमधून भाजी कापण्याचा चाकू आणून थेट त्यांच्या गुप्तांगावर वार केला. या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि ते गंभीर जखमी झाले.
( नक्की वाचा : Trending News: 4 लेकरांचा बाप, तरुणीशी अफेअर आणि एक भयानक व्हिडिओ; बाथरुममधील त्या घटनेनं काळजाचा ठोका चुकेल )
इतक्या गंभीर अवस्थेतही पीडित व्यक्तीने कसेबसे स्वतःचे घर गाठले. तिथे त्यांच्या मुलांनी आणि मित्रांनी त्यांना तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेले, जिथून त्यांना पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या मते, जखम खूप खोल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर फरार झालेल्या महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. प्रेमसंबंधांमधून टोकाचे पाऊल उचलल्याची ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world