पती दारूच्या प्रेमात, पत्नी गोटूच्या प्रेमात; परिणाम भयंकर झाला

दोन दिवसात प्रमोदच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मंगला मेसरे हिचं बिंग फुटलं. शवविच्छेदन अहवालात प्रमोद यांचा गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं.

जाहिरात
Read Time: 2 mins
अकोला:

अकोल्यातील एका महिलेने दिरावरील प्रेमाखातर आपल्याच पतीच्या हत्येचा कट आखल्याचा क्रूर प्रकार घडला. पतीची हत्या केल्यानंतर सर्व आलबेल असल्याचं आरोपींना वाटत असताना वैद्यकीय अहवालामुळे दोघांचंही बिंग फुटलं. आता वहिनी-दीर दोघांवरही तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशी गावातून हा प्रकार उघडकीस आला आहे. अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावात मेसरे नावाचं दाम्पत्य बाळापूर तालुक्यातीलच तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी गेलं होतं. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं या दोघांची नावं आहेत. इथं काम करीत असताना रविवारी अचानक प्रमोदचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं ?

प्रमोदच्या मृत्यूबाबत पत्नीनं बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री झोपेत असताना पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. सुरुवातील पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. सह पोलीस निरीक्षक पंकज कांबळे या प्रकरणात तपास करीत होते. पतीला दारूचं व्यसन होतं. व्यसनाधीनतेतून त्याचा मृत्यू झाल्याचं तिने पोलिसांना भासवलं होतं. 

Advertisement

दरम्यान दोन दिवसात प्रमोदच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मंगला मेसरे हिचं बिंग फुटलं. शवविच्छेदन अहवालात प्रमोद यांचा गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी याचा तपास सुरू करताच मंगलाचं तिच्या दिरासोबत असलेले विवाहबाह्य संबंध समोर आले. मृत प्रमोदचा चुलत भाऊ गोटू मेसरे याच्यासोबत मंगलाचे विवाहबाह्य संबंध होते. गोटू हा वारंवार घरी येत होता. यातूनच मंगला आणि गोटूमध्ये जवळीकता वाढली आणि दोघांचंही सूत जुळलं. मात्र दोघांच्या प्रेमात पतीचा अडसर होत असल्याने मंगलाने दिराच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. हा आकस्मिक मृत्यू असल्याचं पोलिसांना भासवण्यात आलं. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांना याचे धागेदोरे लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगला आणि गोटू यांचं प्रेम खूप पुढं गेलं होतं. गोटू हा अविवाहित असून त्यांच्या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला लागली होती. प्रमोदनं दोघांचं भेटणं बंद केलं होतं. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा तिने ठरवलं आणि अखेर पतीची हत्या केली.
 

Advertisement