जाहिरात

Solapur News : बहिणीच्या लग्नाचा आनंद, मात्र...लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला

बहिणीचं लग्न हा भावाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो, आपल्या बहिणीच्या आनंदात सामील होण्यासाठी भाऊ नातेवाईकांना लग्नपत्रिका वाटत होता. तेव्हाच घात झाला.

Solapur News : बहिणीच्या लग्नाचा आनंद, मात्र...लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

सध्या लग्न समारंभाची धामधूम सुरू असून अनेक जण मंडप डेकोरेशन, सजावट आणि डिजेवाद्य अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल सुरू आहे. दुसरीकडे वधू-वर यांच्या नातेवाईकांकडून पाहुण्यांना वेळेवर निमंत्रण पोहोचावं यासाठी धावपळ करीत असतात. या दरम्यान, अकोल्यात 5 जूनला एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लग्न सोहळ्याची पत्रिका नवरीच्या भावाने नातेवाईकांना पोचवण्यासाठी सुरू केली. मात्र नियतीला ते पसंत पडलं नाही आणि नवरीचा भाऊ शिवमचा बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी जात असताना अकोल्याच्या उड्डाणपुलावर कारच्या जबर धडकेत मृत्यू झाला.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा पूल वाहन चालकांसाठी ठरतोय जीवघेणा...

पाच तारखेला बहिणीचा विवाह सोहळा तर दुसरीकडे शिवमच्या मृत्यूची बातमी कळतात नवरीला एकच धक्का बसला. नवदीप वधु-वर यांच्या घरी एकच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अकोला शहरातील वाहतूक सुरळीत आणि नियंत्रित व्हावी यासाठी जेल चौक ते अग्रेसर चौकापर्यंत शहरात उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र हा पूल वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. पूल तयार झाला तेव्हापासून आजवर या पुलावर अनेक अपघात झाले, यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात झाला. शिवम नावाच्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. शिवम जानराव आगळे असं अपघातात मृत्यू झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे.  शिवम त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी जात होता. तेव्हाच ही दुःखदायक घटना घडली.

शहरातील उड्डाणपुलावर गुरुवारी उशिरा सायंकाळी एका चारचाकी वाहनाने दुचाकी चालकाला जोरदार जबर धडक दिली. यावेळी दुचाकी डिव्हायडरवर आदळून अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील युवक शिवम हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. शिवम आगळे हा अकोल्याच्या गुरुकुल कोठारी वाटिका १ येथील रहिवासी आहे. शिवमच्या बहिणीचे ५ जूनला लग्न असल्याने तो बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होता. रात्री उशिरा घरी परतत असताना उड्डाणपुलावर भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. जोरदार धडकेमुळे त्याची दुचाकी पुलावरील डिव्हायडरवर आदळली.  त्यात शिवम हा रस्त्यावर पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

Ravikant Tupkar car accident : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कारला अपघात, ट्रकची धडक; अपघात की घातपात?

नक्की वाचा - Ravikant Tupkar car accident : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या कारला अपघात, ट्रकची धडक; अपघात की घातपात?

अकोल्याचे उड्डाणपुल हे अपघात प्रवणस्थळ

आश्चर्यदायक म्हणजे ज्या वाहनाने शिवमच्या दुचाकीला धडक दिली. त्या वाहनाने आणखी वाहनांना धडक दिल्याची सूत्रांची माहिती आहे. या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत. जेलचौक ते टॉवर चौकापर्यंत उड्डाणपुल हे अपघात प्रवणस्थळ बनलं असल्याने भरधाव वाहनांकडून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. या पुलावर हिट अँड रनचे प्रकारही घडले आहेत. पोलिसांची पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास अपघातात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पुलावर वाहन चालकांची सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी अनेक दिवसांपासून रेंगाळत असून संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतय. जर पोलिसांची पहारा ठेवला तर अनेक शिवम सारखे तरुणाचे प्राण वाचू शकतात. दरम्यान सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या भीतीपोटी अपघात होण्याची शक्यता ही कमी होऊ शकते.. मात्र शासन दरबारी अकोलेकरांची मागणी चा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून तसाच पडून आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com