जाहिरात

Panvel : मुलगा नाही, पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल!

Panvel News : वैष्णवी हगवणे  प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची धक्कादायक प्रकरणं उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे. 

Panvel : मुलगा नाही,  पैसे आण... सासरच्या त्रासाला कंटाळून 5 वर्षांच्या मुलीसह विवाहितेचं टोकाचं पाऊल!
मुंबई:

प्रथमेश गडकरी, प्रतिनिधी

पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane Death Case) या विवाहित महिलेनं सासरच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं. वैष्णवीचा लग्नानंतरही हुंड्यासाठी छळ सुरुच होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. वैष्णवीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास सध्या सुरु आहे. वैष्णवी हगवणे  प्रकरणानंतर राज्यभरातून या पद्धतीची धक्कादायक प्रकरणं उघड होत आहेत. पनवेल तालुक्यातही याच पद्धतीची एक घटना उघडकीस आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पनवेल तालुक्यातील पेठाली गावात  सोनम अभिषेक केणी (वय ३०) हिने आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह देवांशीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सोनमने गळफास लावून जीवन संपवले, तर मुलीचा मृतदेहही घरातच आढळला. ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप सोनमच्या माहेरच्यांनी केला आहे. 24 एप्रिल रोजी सोनमनं जीव दिल्याची माहिती आहे. 

काय आहे प्रकरण?

सुरुवातीला पोलिसांनी मुलीचा अपघाती मृत्यू व सोनमने नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद केली होती. मात्र, सोनमच्या वडिलांनी 1 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नापासून मुलगा नसल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सोनमचा सासरच्यांकडून सतत मानसिक छळ होत होता. या आधारावर पोलिसांनी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात

( नक्की वाचा :  Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात )

सोनमने मुलीचा खून केला की दोघींचाही मृत्यू अन्य कारणाने झाला, याचा तपास पोलीस करत असून, सोनमची सुसाईड नोट व वैद्यकीय अहवालातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती फरार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तळोजा पोलिसांकडून सोमनच्या चारही नणंदांची चौकशी सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com